Home मराठवाडा गणपती नेत्र ऑप्टीकल द्वारा आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

गणपती नेत्र ऑप्टीकल द्वारा आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

530

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे २६ जानेवारी रोजी येथील गणपती नेत्र ऑप्टीकल द्वारा मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या टिचर ब्रह्माकुमारी दिपा बहेन, सामाजीक कार्यकर्ते रामेश्वर लोया यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बालरोग तज्ञ डॉ.जीडी आस्कंद,डॉ.रशिद पटेल,कल्याणराव तौर,दीगंबर गुजर,किशोर तौर,कुलदीप पवार,गोपालभैया राजुरकर, किशोर मुन्नेमाणीक,राधाकृष्ण भालेकर,अशोकराव सुरासे ,कल्याण कंटुले ,ज्ञानेश्वर कंटुले,अर्जुन कुरधने,दत्तात्रय जगताप यांची उपस्थिती होती.गणपती नेत्र ऑप्टीकल द्वारा आयोजित नेत्र तपासणी शिबिरामध्ये २१० महिला आणि पुरूषांच्या डोळ्यांची कांम्प्युटर मशीनने तपासणी करण्यात येवून चष्म्याचा अचूक नंबर काढून देण्यात आला.गणपती नेत्र ऑप्टीकलच्या वतीने स्वस्त दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. गणपती नेत्र ऑप्टीकलचे संचालक आदित्य लक्ष्मण बिलोरे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. गणेशराव कंटुले सर यांनी केले तर उपस्थीतांचे आभार लक्ष्मण बिलोरे यांनी मानले.