Home बुलडाणा दिव्यांग बेसहारा निराधारांना देऊळगाव माळी ग्रामपंचायत ने वाटप केला दिव्यांग निधी .

दिव्यांग बेसहारा निराधारांना देऊळगाव माळी ग्रामपंचायत ने वाटप केला दिव्यांग निधी .

468

..अन् निराधार दिव्यांगांच्या चेहर्यावर हसु उमटले .

देऊळगाव माळी – ( प्रतिनिधी कैलास राऊत ) दि. २८ – 
दिव्यांगांसाठी स्वनिधीतील ५ टक्के निधी राखीव ठेवा आणि तो त्याच वर्षी दिव्यांगांसाठी खर्च करा असे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींना या पुर्वीच दिले आहेत.दिव्यांगाचा निधी वर्षभरात खर्च झाला नाही तर शिल्लक निधी पंचायत समिती, ग्रामपंचायतीने अपंग कल्याण निधीत जमा करावा, वैयक्तिक लाभाच्या योजनेतील रक्कम दिव्यांगांच्या थेट खात्यावर जमा करावी असे आदेश आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वनिधीतील ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. हा निधी दिव्यांगांसाठी वैयक्तिक व सामाजिक स्वरूपाच्या योजनांवर खर्च केला जात असताना बहुतांश व्यक्तिगत विकासासाठी या योजना हाती घेणे गरजेचे असले तरी सदर निधी त्या प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असतो परंतु जिल्ह्यात असंख्य ठिकाणी हा निधी वाटपच करण्यात येत नाही असे दिसुन येते परंतु देऊळगाव माळी ग्रामपंचायतीच्या वतिने हा निधी सरपंच किशोर गाभणे यांनी प्रजासत्ताकदिनी वाटप केला असुन या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच किशोर गाभणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मेहकर पं.स.गटविकास अधिकार आशिष पवार ,पं.स.विस्तार अधिकारी (कृषी) अशोक मुळे,विस्तार अधिकारी जगन्नाथ आरू,यांच्या हस्ते गावातील १५ दिव्यांग निराधारांना प्रत्येकी दोन हजार रुपयाचा धनादेश वाटप केला , यावेळी उपसरपंच रंगनाथ चाळगे, ग्रामविकास अधिकारी गजानन म्हस्के, मुख्याध्यापीका श्रीमती विजया जगधने, शाळा व्यवस्थापन समिती नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन गाभणे, तंटामुक्त अध्यक्ष केशव मगर, केंद्रप्रमुख के.सी.काळे, पञकार कैलास राऊत , पोलीस पाटिल गजानन चाळगे, ग्रा
.पं सदस्य स्वप्निल गाभणे ,गजानन राजगुरू,सारिका खरात ,किरणताई, गाभणे,सविता ताई गाभणे,मायाताई गवई,इ.मान्यवरांसह सर्व ग्रामपंचायत चे व शाळाव्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य , अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा सेविका, व मराठी प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक वृंद कर्मचारी व ,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते “

यावेळी जिल्हा स्तरावर मतदान अधिकारी बि एल ओ म्हणुन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शिक्षक अरूण गंगाराम बळी व तालुका स्तरावर शिक्षक संतोष काशिनाथ चोपडे यांचा गटविकास अधिकारी आशिष पवार यांनी सत्कार करून कौतुक केले,

“कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक अरूण बळी यांनी केले.