Home सातारा खटाव तालुका शिक्षक समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व पत्रकारांचा सत्कार

खटाव तालुका शिक्षक समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व पत्रकारांचा सत्कार

841

मायणी : प्रतिनिधी सतिश डोंगरे

खटाव तालुका शिक्षक समितीच्या वतीने सद्गुरु मातोश्री सरुताई मठ मायणी येथे स्फूर्ती शिक्षण मंडळाचे हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर मायणी शाळेचे गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थींनी व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला .

या प्रसंगी बोलताना खटाव तालुका प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक श्री चंद्रकांत मोरे सर म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी गुणवंत विद्यार्थांचा सत्कार घेता आला नाही याची खंत मनामध्ये राहून गेली . परंतु समितीने यावेळी ठरविले आहे . शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे . विद्यार्थ्यांनी सुद्धा यातून प्रेरणा घ्यावी . कष्ट, आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही पुढे जाणार आहात . यापुढे ते म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी आपल्याला वृतपत्रातून देणारे पत्रकार मित्रांचेही सहकार्य सतत लाभत असते त्यांचाही सन्मान होणे आवश्यक आहे . एवढे बोलून गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमा वेळी बोलताना स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचेे संस्थापक – अध्यक्ष माजी .आ .डॉ .दिलीपराव येळगावकर म्हणाले, शिक्षक समितीचा इतिहास मला माहित आहे . प्रथम मी ईश्वराला प्रार्थना करतो समितीची सत्ता यावी . अतिशय चांगले उपक्रम राबवणारी शिक्षक समिती आहे . गुणवंत विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे . त्यांनी ते करावे . विद्यार्थांना प्रेरणा देण्याचे काम शिक्षक समिती करत आहे .त्याबद्दल समितीचे अभिनंदन . विद्यार्थांनी सुद्धा माझाही गुणवंत विद्यार्थी म्हणून सन्मान व्हावा .अशी जिद्द बाळगावी . विद्यार्थी हा शाळेचा कणा आहे . तो कणा मजबूत असला पाहिजे . कोरोनाचे नियम पाळूनच शाळेत या, तुम्ही तुमचे भविष्य घडवा . आणि आपल्या शाळेचे नावलौकिक वाढवावा . गुणवंत विद्यार्थींना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देऊन खटाव तालुका शिक्षक समितीचे अभिनंदन केले . यावेळी हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर मायणी शाळेची विद्यार्थींनी कु . श्रावणी विजय देशमुखे हिने शिष्यवृत्ती परिक्षेत उज्वल यश संपादन केल्या बद्दल शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन शिक्षक समितीच्या , शाळेच्या, व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .तसेच पत्रकारांना ही शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमा वेळी खटाव तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष अर्जून यमगर सर, लावंड सर, राजन घोसपूरकर सर, रमजान इनामदार सर, जावेद इनामदार सर, संजय पाटोळे सर, प्रकाश भोंगाळे सर, सिद्धनाथ देशमुख सर, संस्थेचे कार्याध्यक्ष राजाराम कचरे, जयवंत शिंदे, रघुनाथ ससाने , निलम वाघमोडे मॅडम, विजया सुगदरे मॅडम, चंद्रशेखर देशमुखे सर, सचिन कचरे सर, संस्थेचे माजी सचिव, व पत्रकार पांडूरंग तारळेकर, नाना चव्हाण, सतिश डोंगरे, विशाल चव्हाण, व संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयवंत शिंदे, व रमजान इनामदार सर यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक दिपक खलिपे सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .