Home महत्वाची बातमी कष्टकरी पत्रकारांनो आपल्या आयुष्याची माती होत असतांना केवळ उत्सवी गप्पगार किती दिवस...

कष्टकरी पत्रकारांनो आपल्या आयुष्याची माती होत असतांना केवळ उत्सवी गप्पगार किती दिवस राहणार?

706

राम खुर्दळ

पत्रकारिता ही सामाजिक परिवर्तनाची चळवळ , लोकजागृती , सामाजिक मुद्द्यांना वाचा फोडणारी पत्रकारिता सध्या विषमतेचा , उपेक्षेचा दाह भोगीत आहे,आपणच आपल्या मूलभूत मुद्द्यांना तिलांजली देऊन की काय?आपण आपल्याच पायावर धोंडा मारत आहोत याची थोडी ही खंत व्यक्त करतांना फारसे काही ग्रामीण/शहरी पत्रकार भेटत नाही की दिसत नाही,केवळ वरवरच्या वल्गना वरवरची मांडणी व भान विसरून स्वतःचे ज्वलंत मुद्दे , विवंचना विचारणारे आपण पत्रकार आपलेच अस्तित्व आपलेच प्रश्न,मुद्दे विसरलोय हेच खटकतं म्हणून हा नेहमीचाच लेख प्रपंच…
मी मुळता ग्रामीण पत्रकारितेतील आयुष्याची ३३ वर्षे या क्षेत्रांत आहे.उच्चशिक्षित पत्रकारिता विषयाचे बारकावे जाणून समजून घेणारा,पत्रकारितेचे विविध स्थरांची कार्यपद्धती जाणून घेणारा एक पामर.. संवाद व माध्यमे क्षेत्रात पथनाट्य,नाट्य,लोककला,पेपर, चित्रपट,माहितीपट,वक्ता,अश्या विविध माध्यमांत पारंगत धडपड्या माणूस,जलसंवर्धन,दुर्गसंवर्धन चळवळ,ग्रामविकासाचा प्रचारक,हा माझा अल्प परिचय,मी माझ्या आयुष्यातील अडचणीच्या 1988 साली या काळात पत्रकारितेत आलो.वेड होत लिखाणाच,त्यामुळं सडेतोड स्पष्ट मांडणी करून वृत्तांकन करतांना दमदाटया , मारहानी , प्रसंगी अडवणुकी , व्यवसायात अडफाटे,घरच्यांना समाज कंटकांकडून मानसिक त्रास,अवमान,अपमान हे सर्व सहन करीत याच मार्गावरची दुरवरची वाट आजही तशीच चालत आहे,त्याकाळी वाटायचे की बदल होईल,पत्रकार जागा होईल,बिनपगारी,मोठे जबाबदारीचे ओझे पेलणारा प्रसंगी बातमीचे वाईट परिणाम भोगणारा पत्रकार त्याच्या मूलभूत मुद्यांवर लढेल,निश्चित समाजातील अन्य घटकांप्रमाणे ग्रामीण/शहरी बिटवरील पत्रकारांचे कौटुंबिक,सामाजिक जीवन सुसह्य होईल अशी आशा मला तीन दशकांपूर्वी निश्चित होती , वाटायची मात्र ही वाट चालतांना श्रमजीवी , बिनपगारी बेभरवश्याची पत्रकारिता करणारे ग्रामीण/शहरी लाखों पत्रकार मात्र आजही कित्येक मूलभूत विवंचना,उपेक्षा सहन करीत आहे,मात्र गप्पगार बसून,निष्क्रिय नेते व संघटनांच्या पदाला,पुरस्काराला कवटाळत बसला आहे. आपले रोजचे धकाधकीचे जगणे,पत्रकारितेसाठी होणारा खर्च,हाती येणारे तुटपुंजे मानधन,किंवा तेही नाहीच,मग आपण नेमके कुठले अधिकार स्वतःच्या पदरात पाडले?हा प्रश्न आपण पत्रकार स्वतःला का विचारत नाही,घरात कोणी आजारी झाला त्याचा खर्च ही पेलणे अवघड,रस्त्यात आपला अपघात झाला तर उपचार सोडा,भविष्यही धोक्यात, मुलाबाळांची शिक्षणाला खर्च,घरातील लाईटबिले , घरपट्या,आई वडिलांचे आजारपणाचे खर्च,घरातील लग्न कार्ये,स्वतःचे घर नसल्यास घरभाडे,असा अनेकविध खर्चाच्या कोंडीत सामान्य ग्रामीण/शहरी बिटवरील पत्रकार आहे,मात्र तो फारसा बोलत नाही,बोलला तर त्याला मुद्दा सुटेल असे वाटत नाही,मग आपण आपल्या संघटना,आपले विचार,आपल्या माध्यमातून आपल्या मुद्द्यांवर किती लिहितो?किती दाखवतो?किती आंदोलने करतो?यावर कितीजण उत्तरे देतील,चिरीमिरी निवेदने देण्या इतपत आपली वाटचाल,भविष्य,वर्तमान टांगणीवर,हे किती सहन करायचं?
पत्रकारिता बदलते मान्य आहे,मात्र सामान्य पत्रकारांचे आयुष्य किती बदलले?यावर चिंता मात्र पत्रकार दिनाच्या सोहोल्यात ही फारशी दिसते कुठे?उत्सवात हरावणारे आपण?बसतो नेत्या अधिकारयांचे हार घेत,आपल्यातील काही बहाद्दर केवळ अधिकारी नेते यांचीच लाल करत असतात,मात्र ह्या स्वार्थापोटी आपण समाजाचा आरसा आहोत हे स्वतःला विचारायला आपण स्वतःला परावृत्त करीत नाही.निष्ठता,तत्व,व परखड,सत्य प्रवृत्ती अंगी बाळगणारे कित्येक जण मातीत गेले त्यांना ती वेळ आणणारे स्वतःला चिरीमिरीत विकतात हेच तर काही मंडळींचे काम,मात्र यामुळं आपली विश्वासह्यता आपण गमावून बसलो यात होरपोळले ते सामान्य निष्ठावान पत्रकार,हे परखड पत्रकार नेते बातमीत वास्तविकता मांडतात मात्र यात काही अपप्रवृत्ती ना असे निर्भीड पत्रकार नको असतात,अश्यावेळी अपप्रवृत्ती बळावते ते पत्रकारितेच्या विरोधकांना बळ देतात,मात्र आपणच आपल्या पेशाला दावणीला लावतो,जे पत्रकारितेला कलंक आहे त्यांना ही आपण एकत्रित विरोध करीत नाही,हेच आपले दुर्दैव,आपल्यात एकी नाही दुही आहे,आपण सामान्य लोक सभासद दुःखी आहोत मात्र निष्क्रिय नेते मात्र खुशाल आहेत,व्यावसायिकता जोपासताना आपण आपली मूल्ये विकली की त्याचे भोग अख्ख्या पत्रकारितेला भोगायला लागतात याची चिंता करणार कोण?जोपर्यंत या क्षेत्रातील जाणकार एकत्रित यावर अभियान जागृती लढा देणार नाही,तोपर्यंत सरकार,भांडवली माध्यमांचे मालक,वरिष्ठ,अधिकारी समाज आपल्याला प्रतिष्ठा सन्मान व आपल्या हक्कांना मान्य करणार नाही.यासाठी आपण स्वतःला आपले प्रश्न मुद्दे विचारले पाहिजे,आपला वापर करणाऱ्यांपासून दूर झाले पाहिजे, व्यावसायिक ता जोपासताना कुन्हाचे हुजरेगिरी करू नये,आपली आचारसंहिता पाळावी तेव्हाच सामाजिक दृष्ट्या आपल्याला सुरक्षा,सन्मान,हक्क मिळतील,यासाठी पुढाकार घेणाऱ्या संघटना व्यक्तींची गरज आहे.

राम खुर्दळ ( राज्य उपाध्यक्ष )

पत्रकार संरक्षण समिती , महाराष्ट्र