Home मराठवाडा अंबड तालुका ग्रामीण पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी रविंद्र घाडगे,उपाध्यक्षपदी फकिरा मोहम्मद बागवान तर...

अंबड तालुका ग्रामीण पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी रविंद्र घाडगे,उपाध्यक्षपदी फकिरा मोहम्मद बागवान तर सचिव पदी पवन पवार यांची निवड

509

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

अंबड तालुका ग्रामीण पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी रविंद्र घाडगे,उपाध्यक्षपदी फकिरा मोहम्मद बागवान तर
सचिव पदी पवन पवार यांची निवड करण्या आली आहे.
दि.१९ जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह वडीगोद्री येथे ग्रामीण भागातील पत्रकारांच्या बैठकीत नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारणीत सरचिटणीस दिलीपराव दखने,सह सचिव अशोक गायकवाड,सहसरचिटणीस कृष्णा आगलावे, कार्याध्यक्ष रोहित पवार,सह कार्याध्यक्ष किर्तीनंद गांगुर्डे, सल्लागार अनंत मुंडे,सह सल्लागार,अशोक चांगले खजिनदार राजेंद्र छल्लारे,सह खजिनदार सिद्धार्थ उघडे यांची सर्वानुमते नवीन कार्यकारिणीच्या निवडी जाहीर केल्या आहेत.यावेळी सदस्य सुरेश काळे ,राजेंद्र पवार,अजय मासुळे,प्रवीण काळे आदी उपस्थित होते.निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा अंबड तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आले.