Home जळगाव माळी समाज पंच मंडळ व समाजाच्या वतीने स्त्री शिक्षणाची जननी क्रांती ज्योती...

माळी समाज पंच मंडळ व समाजाच्या वतीने स्त्री शिक्षणाची जननी क्रांती ज्योती सावित्री माई फुले यांची 191 जंयती उत्साहात साजरी

228

रावेर( शेख शरीफ)

रावेर येथील सावित्रीबाई फुले नगर येथील नियोजित माळी समाज मंगल कार्यालया शेजारील परीसरात आज स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 191 व्या जयंतीच्या अनुषंगाने प्रतिमेस सावित्रीच्या लेकींनी सर्व प्रथम क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला नंतर सावित्री नगर येथील महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीमाई यांच्या प्रतिमेस सौ . शकुंतला रमेश महाजन, सौ संगीता भास्कर महाजन तसेच सर्व मान्यवर उपस्थित महिलांनी प्रतिमेचे पुजन तसेच वंदन केले त्यानंतर लहान चिमुकल्या मुली सोबत माळी समाजाच्या भगिनी अर्थात “सावित्रीच्या लेकी ” यांनी सावित्रीमाईच्या जिवन कार्याचा उजाळा देत त्यांनी केलेले महील्या साठी कार्य भारतातील पहील्या महीला शिक्षक आधी पती महात्माजोतीराव फुले यांच्या जवळून शिक्षणाचे धडे घेतले व नंतर पहील्या शिक्षीका म्हणुन समाजात थोर समाज सुधारक , शिक्षक तज्ञ आणि कवियत्री ओळख निर्माण केली तसेच सावित्रीमाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांनी 1848 मध्ये पुणे येथे भिडे वाड्यात मुलीसाठी पहीली शाळा उघडली व स्त्री शिक्षणाच . व्दार सर्वासाठी खुले केले शिक्षण कोणाची मक्तेदारी नसुन यासाठी सामाजिक दंडेलशाही झुगारुन वेळेवर शेण पाणी शिव्याचा मारा सहन करीत 1848 ते 1852 ह्या कालावधीत सावित्रीबाई यांनी मुली साठी पुणे येथे 18 शाळा काढल्या जोतीराव फुले यांच्या खांद्या खांदा लावत समाजातील अनिष्ठ प्रथा यावर मोठे प्रहार करण्यात मदत केली विधवेच्या मुलास दत्तक घेतले त्यांचे नाव यंशवंत ठेवले तसेच जोतीराव फुले यांच्या निधना नंतरही त्यांनी न खचता समाजातील विविध प्रकारच्या उपक्रम राबविण्यात यशस्वी झाल्या पुणे येथे प्लेगच्या साथीत सेवा करतांना त्यांचे निधन झाले अश्या कितीतरी आठवणीस आज उजाळा देण्याचे कार्य रावेर येथे सावित्री च्या लेकी यांनी आपल्या शब्दात मांडल्या तसेच समाजातील भगीनी यांच्या विशेष असा हळद कुंकु चा कार्यक्रम झाला भगीनीची संख्या लक्षणीय असल्याने कार्यक्रमास एक वेगळाच उत्साह तसेच एकात्मता दिसत होती या कार्यक्रमा प्रल्‍हाद प्रल्‍हाद महाजन विश्वस्त पद्माकर महाजन माजी अध्यक्ष संजय विठ्ठल महाजन माजी अध्यक्ष .श्रीराम माधव महाजन .रामदास महाजन .एस बी . महाजन सर . टी बी महाजन सर . ,संतोष पाटील रवींद्र पाटील ,मनोज महाजन , एस के महाजन ,उमेश महाजन , प्रकाश महाजन , प्रकाश रतीराम महाजन ,अरुण पाटील , ईश्वर महाजन ,लखन महाजन , भगवान महाजन गौरव महाजन , समाधान महाजन , प्रणित महाजन ,तसेच माळी समाज बांधवांनी ह्या कार्यक्रमा स उपस्थीती दिली कार्यक्रमात मनोगत श्री एस बी महाजन सर , शिक्षीका योगीता ताई महाजन , शिक्षीका प्रियाताई किशोर महाजन यांनी सावित्री चे विचार आपल्या मनोगतात समाज बांधवा समोर मांडले तसेच सुत्र संचालन सौ. दिपाली तुषार महाजन शिक्षीका यांनी केले तर समाजाच्या ह्या कार्यास मोलाचे सहकार्य श्रीराम माधव महाजन यांचे लाभले.