
गावातून कावीळ आजार हद्दपार करण्यासाठी रक्ततपासणी व लसीकरण,योग्यवेळी उपचार आवश्यक..
लोकनेता प्रतिष्ठान च्या वतीने आयोजित आरोग्य शिबीर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..
आदिल ऐच पठाण ,
अंढेरा/प्रतिनिधी:- येथील लोकनेता प्रतिष्ठान च्या वतीने आरोग्य शिबीर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र भर वैदकीय क्षेत्रात नावलौकिक असलेले पोटविकार तज्ञ मा.रमेश सातारकर ,औरंगाबाद यांची उपस्तीत होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सौ शारदा मांटे,जगन सानप, डॉक्टर रमेश दंडे यांची उपस्थिती होती,यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना मा.डॉ.रमेश सातारकर यांनी उपस्तीत जनसमुदायाला कावीळ आजार, पोटाचे होणारे आजार, आणि ऍसिडिटी बाबत सखोल आणि महत्वाचे मार्गदर्शन केले,यावेळी ते म्हणाले मागील 3 ,4 वर्षात अंढेरा गावचे अंदाजे 70 च्या जवळपास रुग्ण माझ्या कडे उपचारा साठी आले त्यांचं निदान ही झालं परंतु गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात कावीळ का होतो हा संशोधनाचा विषय आहे, कावीळ जर गावातून हद्दपार करायचा असेल तर आपल्याला कावीळ सारखे काही लक्षण आढळल्यास ,संशय असल्यास याचे निदान गप्प बसून होत नसून यासाठी आपल्याला वेळेवर याचे उपचार करावे लागेल ,रक्तपासणी,चाचण्या करणे आवश्यक आहे तर आपण कावीळ आजारावर औषधोपचार करू शकतो,आणि जर या आजाराला काहीप्रमाणात हद्दपार करायचे असेल तर त्यासाठी मार्गदर्शन घेऊन गावात रक्ततपासणी शिबिर ठेऊन ज्यांना ही लक्षण आढळी त्यांनी लसीकरण करून घ्यावे यामुळे ही कावीळ चे प्रमाण कमी होण्यास मदत होईल असे मत मा.रमेश सातारकर यांनी व्यक्त केले.पुढे बोलतांना ते म्हणाले ऍसिडिटी चा त्रास हा एकाच कारणामुळे होत नसून याची वेग वेगवेळी कारण असतात यामध्ये अवेळी जेवण करणे, रात्री जेऊन लगेच झोपणे, उशिरा रात्री पर्यंत जागने,उशीरा उठणे यामुळे ही ऍसिडिटी चा त्रास होतो,त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाने ठरवून दिलेल्या नियमाने आपण राहिलो तर ऍसिटीडी सारख्या विविध आजारापासून आपण दूर राहू शकतो असे मार्गदर्शन ही यावेळी डॉ सातारकर यांनी केले.अंढेरा गावासाठी माझ्याकडुन जे काही आरोग्य विषयी मार्गदर्शन लागेल,मदत लागली तर लोकनेता प्रतिष्ठान व गावकरी यांनी मला कधी ही संपर्क करावा मी नक्कीच तुमच्या सोबत आहोत असे वचन ही यावेळो डॉ सातारकर यांनी दिले.तसेच सामाजिक हिताचा कार्यक्रम आयोजित करून मला बोलवले त्यासाठी लोकनेता प्रतिष्ठान सर्व सदस्यांचे ही यावेळी डॉ सातारकर यांनी कौतुक करत आभार व्यक्त केले.यावेळी प्रा.दिलिप सानप,खंडू मांटे,भास्कर तेजनकर,आदील पठाण यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी रमेश नागरे, संतोष उद्धव सानपनागरे(मा.सरपंच अंढेरा),अनिता नागरे, लिलाबाई नागरे, उद्धव सानपअमोल इंगळे,राधेश्याम ढाकणे, बद्री मुंढे, गणेश सानप, संदीप गुठे,आनंथा ताठे, बबन वाघ, बद्री सानप, विष्णू केदार,विष्णू पुंजाराम नागरे बनसोडे,मनोज सानप, माधव आंधळे, भगवान डोईफोडे, संजय सानप, विष्णू काकड, पंढरी तेजनकर नितीन सानप यासह लोकनेता प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी,सदस्य व गावातील तोलामोलाची मान्यमावर, जेष्ठ नागरिक, युवा वर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिल पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन विष्णू बनकर यांनी मानले












































