Home बुलडाणा बेळगाव येथील पुतळा विटंबन पार्श्वभूमीवर दुग्धाभिषेक शिवप्रेमींनी कर्नाटक मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेस जोडे...

बेळगाव येथील पुतळा विटंबन पार्श्वभूमीवर दुग्धाभिषेक शिवप्रेमींनी कर्नाटक मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेस जोडे मारून रोष व्यक्त केला

651

प्रतिनिधी:-[ रवि आण्णा जाधव ]
देऊळगाव राजा : बेळगाव येथे समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेध नोंदवून येथील शिवप्रेमींनी शहरातील छत्रपतींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला दरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी कर्नाटक येथील मुख्यमंत्री यांच्या प्रतिमेस जोडे मारून रोष व्यक्त केला
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची कर्नाटक येथील बेळगाव येथे समाजकंटकांनी विटंबना केली यानंतर तेथील मुख्यमंत्री यांनी बेताल वक्तव्य केले या घटनेने संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी कर्नाटक येथील मुख्यमंत्र्यांच्या प्रथमेश जोडे मारून रोष व्यक्त केला यावेळी शिवप्रेमींनी त्या घटनेचा निषेध नोंदवून स्थानिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घातला यावेळी नंदन खेडेकर,अतिश खराट, अभय दिडहाते, सचिन व्यास आकाश जाधव संकेत भुतेकर योगेश खराट, हर्षद हरकळ अजय जावळे सुशील इंगळे राजू पाटोळे सचिन अवसरमोल आनंद पाटोळे यांच्यासह शिवभक्तांची उपस्थिती होती
*छत्रपतींना दुग्धाभिषेक-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना बेळगाव येथे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष खांडेभराड,गणेश सवडे,शहराध्यक्ष अर्पित मिनासे,पं स सभापती हरीश शेटे,गणेश बुरकुल,नवनाथ गोंमधरे, मार्गदर्शनात शिवप्रेमींनी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घातला या प्रसंगी जय जिजाऊ,जय शिवराय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला यावेळी रामविजय नरोडे,प्रदीप वाघ,बंडू डोळस,सुनील शेजुळकर,वैभव भाग्यवंत,हर्षल हरकळ,आकाश जाधव, दत्तात्रेय कवलींगे आदींची उपस्थिती होत

फोटो , छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक घालताना संतोष खांडेभराड