
लाख्याचा झिरा व पलढग धरणातील नौका पर्यटकांचे आकर्षण

बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे
बुलडाणा शहरापासुन अवघ्या 12 किमी अंतरावर अजिंठा डोंगर दरीमध्ये वसलेले ज्ञानगंगा अभयारण्याचा बुलडाणा शहरातील पत्रकारांनी अभ्यास दौरा करुन निसर्गरम्य ज्ञानगंगा अभयारण्यात हजारो वनस्पती,विस्तीर्ण डाडे व प्राण्यांच्या शेकडो प्रजातींचा सहाय्यक वनसंरक्षक वसंत साबळे,पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे, जिल्हाकार्याध्यक्ष बाबासाहेब जाधव,वनपाल एच एन गिते,आर बी नेवरे,आर एस सुर्यवंशी,गाईड श्रीधर अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास दौरा केला.

हे अभयारण्य निसर्गाचा अनमोल ठेवाच आहे. 20,000 हेक्टर पेक्षा जास्त विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेले वनक्षेत्र, उंच डोंगर, खोल दऱ्या, दाट झाडी त्यामध्ये साग, अंजन, सालइ, खैर, मोईन इ. वृक्ष तसेच अनेक प्रकारचे गवतांचे प्रजाती सह बिबट, अस्वल, भेडकी, हरीण, निलगाय, रानडुक्कर मोर ससा अनेक पक्ष्यांचा अधिवास हे या अभयारण्याचे वैशिष्ट्ये आहे.
अभ्यारण्याचे उत्तरेचे व दक्षिणेचे टोकावर असलेले माटरगांव व पलढग धरणाचा विस्तीर्ण जलाशय त्यात असलेली नौकानयन पर्यटकांचे मन मोहित करून टाकतो.तर विस्तीर्ण गवती कुरणे, त्यामधुन कधी-कधी दिसणारी निलगाय, अस्वलांचे दर्शन पर्यटकांना मंत्रमुग्ध केल्या शिवाय राहत नाही.भर उन्हाळ्यात नेहमीच पाणी असणारा लाख्याचा झिरा, बोरबन, वानर कराड येथुन डोळयात भरनारे निसर्गाचे रूप अलौकीक आहे.
अभयारण्याचे मधोमध वाहणाऱ्या ज्ञानगंगा नदीचे काशी नळकुंडावरून होणारे दर्शन तर स्वर्गीय आनंद देणारे आहे.
या अभयारण्यात कोरोना नंतर 17 महिन्यामध्ये 9122 पर्यटकांना भेटी दिल्या आहेत. तर 13 लाख 2 हजार 65 रु निधी महसुल जमा झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे निर्देशांचे अधिन राहून वनपर्यटन सुरू करण्यात आले असुन वन व वन्यजीवांचे संरक्षणामध्ये स्थानिकांचा सहभाग वाढणे, रोजगार निर्मीती व जनजागृती शिक्षणाबरोबर पर्यटकांना सोयीसुविधा सह संधी उपलब्ध करून देणे या वनपर्यटनाचा उद्देश आहे. सर्व पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वसंत साबळे सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) अकोला यांनी केले आहे.तर यावेळी बुलडाणा शहरातील सर्वश्री पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे, बाबासाहेब जाधव,संजय काळे,दिपक मोरे,प्रशांत खंडारे, किशोर खंडारे,रमेश खंडारे,आशीफ,नदीमराजे शेख,रहमद अली,संदीप वानखेडे,शौकत शाह,इसरार देशमुख, सुखनंदन इंगळे,विष्णु कंकाळ, संजय गवई,प्रविण थोरात,कमलेश हिवाळे,प्रशांत सोनुने यांच्यासह अनेक पत्रकारांनी निसर्गरम्य परिसराचा मनमुराद आनंद घेतला.











































