Home विदर्भ “Police पाटील दिनी” पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांच्याकडुन राज्यातील तसेच पारवा पोलीस...

“Police पाटील दिनी” पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांच्याकडुन राज्यातील तसेच पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संपुर्ण पोलीस पाटील यांना शुभेच्छा…!

662

🔵➡️ डिसेंबर 17, आज पोलीस पाटील दिन..!

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी / यवतमाळ – मराठा साम्राज्यामध्ये प्रत्येक गावचे रेकॉर्ड ठेवणे व त्या गांवाचा महसुल गोळा करून शासन दरबारी जमा करणे, असे काम करणारे व्यक्ती म्हणजे पोलीस पाटील होय. त्या काळी पोलीस पाटील यांना त्या गांवचे “पाटील” किंवा “देशमुख” असे संबोधले जायचे. त्यांचे विभागवार कार्य सुद्धा विभागलेले असायचे. उदाहरणार्थ कोकणामध्ये पाटील किंवा कुलकर्णी गांवासाठी आणि देशमुख किंवा देशपांडे हे परगणा म्हणजे जिल्हयासाठी महसुल गोळा करण्याची यंत्रणा होती. कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांनी 15 मे 1912 रोजी “पाटील स्कुल” नांवाची शाळा काढून गांवातील पोलीस पाटील यांना चांगले शिक्षण मिळावे या करिता शाळा काढली होती. पुढे इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाल्यानंतर त्यांचे करिता काम करण्यासाठी या पदाला “पोलीस पाटील” असे संबोधले गेले. देश स्वातंत्र्य झाला त्या नंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाला. आणि त्यानंतर 17 डिसेंबर 1967 रोजी “ग्राम पोलीस अधिनियम 1967 हा कायदा” संमत होऊन, या वर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली. त्यामुळे “Maharashtra Village Police Act, 1967” या कायद्यानुसार गांवातील पोलीस पाटील यांचे कर्तव्य व जबाबदारी निश्चित केल्या गेली. पोलीस पाटील यांच्या सन्मानाकरिता राज्यात 17 डिसेंबर हा दिवस “पोलीस पाटील दिन” म्हणून साजरा केला जातो. गावातील राजकारण, जातीपातीच्या कुरघोड्या, गावातील अलुतेदार – बलुतेदार प्रणाली, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मधील वाद – विवाद, महसुल व पोलीस प्रशासन दोन्हींकडून नियंत्रण व पोलीस पाटील यांच्याकडून करून घ्यायचे काम या सर्व बाबींमुळे पोलीस पाटील यांचे मनोधैर्य खचत होते. पोलीस पाटील यांना गांव पातळीवर चांगल्या पद्धतीने काम करता यावे, या करिता महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र परिपत्रक काढून पोलीस पाटील यांना भादंवि कलम 353 म्हणजे लोक सेवकाचे देखील अधिकार महाराष्ट्र शासनाने दिले आहे. गांवातील पोलीस पाटील यांना धाक दाखवणे, धमकावणे, मारहाण करणे हा अतिशय गंभीर गुन्हा म्हणून यापुढे पोलीस विभागांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. आज पावेतो समाज रचने मध्ये किती बदल झाला तरी पोलीस पाटील या पदाचे महत्व कमी झालेले नाही, हे मात्र निश्चित. गांव पातळीवर काम करणारा सरकारी पोलीस पाटील जर निःपक्ष पाती पणे काम करून गावात दारु, जूगार बंदी, महिला व मुलींची सुरक्षितता याकडे गांभीर्य पुर्वक लक्ष देवून काम केले तर, गांवगाडा अतिशय नंदनवन बनून राहणार यात तिळमात्र शंका नाही. आजच्या 17 डिसेंबर या “पोलीस पाटील दिनी” राज्यातील पोलीस पाटील तसेच पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संपूर्ण पोलीस पाटील यांना मनःपूर्वक धन्यवाद देऊन त्यांचे प्रती ऋण व्यक्त करतो. तसेच भविष्याकरिता त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले आहे.

🟣➡️ (विशेष म्हणजे सदरचा लेख हा…
विनोद चव्हाण,
ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, पारवा (मोबाईल – 8329889565)
यांनी आजच्या “पोलीस पाटील दिनी” आवर्जून लिहला आहे.)