
🔵➡️ मोरेश्वर वातीले यांना माजी आमदार संदीप बाजोरीया यांच्या हस्ते नियुक्ती पत्र..!

अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नव चैतन्य देणारा हक्काचा माणूस मोरेश्वर वातीले यांची आज घाटंजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे पत्र माजी आमदार तथा माजी विधान परिषद सदस्य संदीप बाजोरीया यांच्या हस्ते देण्यात आले. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, जनसामान्य लोकांच्या प्रत्येक न्याय हक्कासाठी धाऊन जाणारा चेहरा, तळागळातून आंदोलनाच्या माध्यमातून तयार झालेला सर्व समावेशक चेहरा म्हणजे मोरेश्वर वातीले होय. घाटंजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एका जनसेवा करणाऱ्या व्यक्तीला दिल्याने होणाऱ्या आगामी निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दमदार पणे लढण्याचे संकेत दिसून येत आहे. या वेळी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोठ्या प्रमाणात बाजी मारेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नव निर्वाचित घाटंजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मोरेश्वर वातीले यांची प्रतिक्रिया घेतली असता, घाटंजी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपुर्ण विस्तार करणार असल्याचे त्यांनी या वेळी बोलतांना सांगितले.
या वेळी यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सतीश भोयर, महिला प्रदेश संघटक प्रियंका पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशीष मानकर, यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्षा सारिकाताई ताजने, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष राहुल कानारकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश बोबडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घाटंजी शहर अध्यक्ष संजय ढगले, घाटंजी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विश्वास निकम, प्रसाद वाढई आदीं मान्यवर उपस्थित होते.










































