Home मराठवाडा सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून ‘समाजभान’ चा स्नेहमिलन सोहळा, राबविले विविध उपक्रम

सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून ‘समाजभान’ चा स्नेहमिलन सोहळा, राबविले विविध उपक्रम

349

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथील रहिवासी आणि सामाजिक, धार्मिक , राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय चमकदार कामगिरी बजावल्यबद्दल अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले दत्ता महाराज टरले यांना समाजभानच्या स्नेहमिलन कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून’ समाजभान’ हि सामाजिक संस्था दादासाहेब थेटे यांच्या नेतृत्वाखाली समाजकार्यात अग्रेसर आहे.समाजभानच्या स्नेहमिलन कार्यक्रमात उद्योग, शिक्षण, आरोग्य, क्रिडा,कला अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.या स्नेहमिलन कार्यक्रमात रक्तदान शिबीर, महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी, औषधी वाटप, वेगवेगळ्या क्षेत्रात झिरो टू हिरो कामगिरी करणाऱ्या भुमिपुत्रांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास जालना जिल्ह्यातील हजारो समाजभान सदस्य उपस्थित होते.समाजभान हा समाज उन्नतीचा महामार्ग बनावा अशी प्रतिक्रिया उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील रायठठ्ठा यांनी व्यक्त केली.समाजभान ही वेगवेगळ्या प्रश्नांवर नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या तरूणांची टीम असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी म्हटले.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी पराग नवलकर , प्राचार्य डॉ.विश्वास कदम , ग्रामविकास राज्यमंत्री डॉ.संजय ढाकणे यांनीही समाजभानच्या कार्याचे कौतुक केले.समाजभानच्या या स्नेह मिलन कार्यक्रमात प्राचार्य डॉ.कदम यांना सेवागौरव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे यांना वैद्यकीय सेवेबद्दल सन्माननीत करण्यात आले.विलास डोईफोडे यांना क्रिडा क्षेत्रातील कामगीरी साठी सन्मानित करण्यात आले,प्रदीप उढाण यांना त्यांच्या झिरो टू हिरो प्रवासाबद्दल सन्मानित करण्यात आले.मोफत आरोग्य शिबिरासाठी योगदानाबद्दल डॉ.मनिषा यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रा.रमेश भुतेकर , उद्योजक दीपक पंच, भाऊसाहेब घुगे,प्रा.राजकुमार बुलबुले, दशरथ बुणगे,जयंत वैद्य, विलासराव दहिभाते,अॅड.गजानन मांटे, गोंदी ठाण्याचे पोनिरिक्षक शितल कुमार बल्लाळ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पडोळे,पोनिरिक्षक बन्शी कांबळे,पोनिरिक्षक मधुसूदन घूगे,सपोनि.महेश भोसले, नारायण देवकाते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.