
मनिष गुडघे
अमरावती शहरामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर प्रशासनाने आता तणावपुर्ण परीस्थितीवर बर्यापैकी नियंत्रण मिळवले आहे; यापुर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीचा दौरा करून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर आरोप केले होते आणि आता भाजप नेते कीरीट सोमय्या सुध्दा अमरावतीमध्ये येऊन पोहचले आहेत, त्यामुळे कीरीट सोमय्या यांच्या दौर्याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. कीरीट सोमय्या यांचा पुर्व नियोजीत दौरा त्यांनी प्रशासनाच्या विनंतीवरुन स्थगित केला होता, अमरावतीमधील तणावपुर्ण परीस्थितीवर प्रशासनाने नियंत्रण मिळवल्यानंतर कीरीट सोमय्या आज अमरावती येऊन पोहचले आहेत.











































