
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
अमरावती – मनिष गुडधे.
आज दि. 13 अमरावती शहरात आज बंदर मन झालेल्या तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातर्फे संचार बंदीचे आदेश लागू करण्यात आला आहे बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडीच्या घटना घडल्या त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया साहित्याच्या कलम 144 (१).(२)(३) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचार बंदी आदेश लागू करण्यात आले प्रभारी पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे की अमरावती शहरात कोणत्याही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे संचार बंदी कालावधीत कोणीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळताइतर कामासाठी घराबाहेर पडणार नाही तसेच पाच पेक्षा जास्त एकत्रित जमणार नाही तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा प्रसारित करू नयेत या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र परत केला आहे असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल हा आदेश आजपासून संपूर्ण अमरावती शहर यासाठी पुढील आदेशापर्यंत लागू राहील असे आदेशात नमूद आहे..










































