Home मराठवाडा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले पत्रकार रविंद्र शिंदे यांचे अपघाती निधन

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले पत्रकार रविंद्र शिंदे यांचे अपघाती निधन

564

जालना – लक्ष्मण बिलोरे

रवींद्र शिंदे वय ३७ वर्ष रा.भोसा तालुका सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा येथील रहिवासी असून,काही कामानिमित्त सिंदखेडराजा येथे जात असताना,नशिराबाद घाटामध्ये पिकप व मोटर सायकल ची समोरासमोर धडक होऊन हा भिषण अपघात झाला आहे.या अपघातामुळे शिंदे परिवार व भोसा येथील गावावर शोककळा पसरली आहे.काही दिवसांनवर दिवाळी येऊन ठेपली असताना, हा अपघात झाल्याची बातमी ऐकून नातेवाईकांना व मित्रमंडळींना धक्का बसला आहे.
त्यांच्या पाश्चात्य एक मुलगा,एक मुलगी,पत्नी,आई-वडील परिवार आहे.मागील काही वर्षापूर्वी त्यांनी औरंगाबाद येथे एफ.एम.रेडिओ चैनल वर काम केले आहे.व मागील एक वर्षापूर्वी न्यूज लोकनायक व गावमत सिंदखेडराजा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.तसेच पत्रकारिता क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे.
तसेच त्यांना गायनांचा खूप आवड होता.निसर्गरम्य डोंगराळ भागांमध्ये त्यांनी अतिशय उल्लेखनीय अशी गिते गायली आहे.व मागील काही वर्षापासून ते इंग्लिश स्कूल वर शिक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या जाण्यामुळे परिसरातील नागरिकावर,मित्रमंडळी वर व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे.