Home विदर्भ भरधाव ट्रकने एकास चिरडले..ट्रक चालकास पोलिसांनी केली अटक

भरधाव ट्रकने एकास चिरडले..ट्रक चालकास पोलिसांनी केली अटक

579

प्रशांत नाईक 

धामणगाव रेल्वे:- तालुक्यातील विटाळा गावालगत असलेल्या मच्छी मार्केट चौकात भरधाव वेगात जात असलेल्या ट्रक क्रमांक MH 32 AJ 2525 याने निष्काळजी पणाने ट्रक चालवीत विटाळा येथील युवकाला ठार केले आहे. शंकर राऊत वय ४५ वर्ष असे मृतकाचे नाव आहे.

सायंकाळी ५ ते ६ वाजता दरम्यान हा ट्रक पुलगाव वरून भरधाव वेगात औरंगाबाद रस्त्याने जात होता. दरम्यान विटाळा येथील मच्छी मार्केट चौकात नेहमीच वर्दळ असते. हे माहीत असताना देखील निष्काळजी पणाने ट्रक चालविला. या निष्काळजी पणामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला. मंगरूळ दस्तगिर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ट्रकचालक आकाश यादव वय २५ वर्ष याला व ट्रक ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी पंचनामा करीत पोलिसांनी शव विच्छेदन करण्यासाठी पुलगाव येथे पाठविण्यात आलाय. या संदर्भात मंगरूळ दस्तगिर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सूरज तेलगोटे अधिक तपास करताहेत..