
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील सौंदलगाव येथे पावसाळ्यात उगणाऱ्या विषारी गवताने ३ जनावरांना विषबाधा होऊन शेतकऱ्यांचे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सौंदलगाव गाव येथील शेतकरी सचिन देवचंद राजपूत यांच्याकडे २ मुऱ्हा जातिच्या म्हैस तर १ गाय होती.पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र जनावरांना हिरवळ चारा उपलब्ध असुन जनावरे चाऱ्या उपलब्ध असल्याने शेजारी जनावरे चारासाठी जातात.सुनील राजपूत दोन म्हैस व एक गाय हे गावातील ओढयाकाठी जनावरे चारण्यासाठी गेले असता पावसाळ्यात ओढयाकाठी व नदीकाठी किंवा दलदल ठिकाणी हे विषारी गवत असते.जनावरांनी खाल्ले असता विषबाधा होऊन अचानक म्हैस हातपाय खोडून तोंडाला फेस येऊन बेसुध्द पडले.
उपचारासाठी पशुधन सहाय्यक विकास अधिकारी डाँ.एन.के.वाघ यांनी या म्हैसवर उपचार करत असताना बाकीचे उपचारादरम्यान पावसाळ्यात उगणाऱ्या गवतामुळे मुत्यु पावले असल्याचे सांगितले.
सदर जनावरांचा पंचनामा करण्यासाठी अंबड तालुका पशुधन विकास अधिकारी डाँ.योगेश अक्षय, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डाँ.एन.के.वाघ,डाँ.सोमनाथ तारख यांनी श्वविच्छेदन व पंचनामा करून महसूल विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याचे डाँ. वाघ यांनी सांगितले.
अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.त्यात विषारी गवताने जनावरे मरण पावल्याने शेतकऱ्यांवर मोठे नुकसान झाल्याने निळीफुले गवताने जनावरांना विषबाधा मोठया प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांनी जनावरे चारताना योग्य ती खबरदारी घेण्याचे पशुसंवर्धन खात्याच्या वतीने आवाहन करण्यात आले.











































