Home विदर्भ न्यायालय प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यास कटिबध्द – न्यायाधिश – एफ. टी. शेख

न्यायालय प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यास कटिबध्द – न्यायाधिश – एफ. टी. शेख

194

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी (यवतमाळ) – ग्रामीण भागातील जनतेला कायद्याची माहिती व्हावी. त्यांच्यात कायद्याविषयी जनजागृती व्हावी या उदांत्त उद्देशातून तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वघारा (टाकळी) येथे स्वातंत्र्य अमृत महोत्सवाचे औचित्य साधून, कायदे विषयक मार्गदर्शन करतांना न्यायालय प्रत्येक व्यक्तीस न्याय देण्यास सक्षम असल्याचे उदगार घाटंजी येथील न्यायालयाच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एफ. टी. शेख यांनी काढले.
🔵 ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांचे मजूरदार वर्गाची परिस्थिती हलाखीची असते. आणि त्यांचे एखादी प्रकरण न्यायालयात दाखल झाले की, त्यांनी घाबरून जावू नये. सोबतच अत्याचार ग्रस्त महिला, ज्यांचेवर एखादी हल्ला झाला असेल आणि या विरोधात न्याय मागण्यासाठी न्यायालयात वकीला मार्फत प्रकरण दाखल करावे लागते. परंतु ज्यांची परिस्थिती नाही, ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत आहे, अश्यांच्या नातेवाईकांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्यास त्यांना न्याय विभागाकडून ५० हजार रुपये ते तीन लाख रुपयांपर्यंत सहाय्य करून न्यायालयामार्फत वकील मिळवून दिल्या जाते, याची माहिती देण्यात आली. शिवाय काही किरकोळ प्रकरणे सुध्दा भिती पोटी तसेच राहतात. मात्र, न्यायालयात अश्या नागरिकांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्यास त्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते. यातून आपसी समझोता सारखे प्रकरणाचा निपटारा होवू शकते. त्यामुळे नागरिकांनी या सर्व न्याय विभागाने राबविलेल्या विविध योजनेचा लाभ घेतला पाहीजे, अश्या सूचना न्यायाधीश एफ. टी. शेख यांनी करुन सोबतच विविध विषयाला अनुसरून न्यायाधिश एफ. टी. शेख यांनी मार्गदर्शन केले. या आयोजित कार्यक्रमात पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी यापरिसरा विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला घाटंजी न्यायालयाचे संगीता भगत, संतोष आकोलकर, सरपंच गजानन गाऊत्रे, उपसरपंच शेख आतिक, भगवान सक्कनवार, जिवन मुद्दलवार यांचे सह तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, कृषी विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी व गावातील शेकडो महिला व पुरुष मंडळीनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे संचालन पोलीस पाटील वैभव डब्बावार यांनी केले. तर आभार पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी मानले.