
जालना- लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती – 2019 करिता दिनांक 22/09/2021 ते 23/09/2021 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्नांच्या बाबतीत काही उमेदवारांनी आपले आक्षेप नोंदविलेले आहेत. सदर आक्षेपावर निर्णय घेण्याकरिता मा. श्री. विनायक देशमुख (पोलीस अधिक्षक, जालना) यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. श्री. विक्रांत देशमुख (अप्पर पोलीस अधिक्षक, जालना), तसेच पोलीस अधिक्षक कार्यालयातील इतर कर्मचारी आदींच्या प्रमुख उपस्थितीत आज दि. 05/10/2021 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, जालना येथे एक समिती स्थापन करून विविध आक्षेपित प्रश्नांवर चर्चा करून याबाबतीत अंतिम निर्णय घेण्यात आला. यावेळी जालना जिल्ह्यातील विविध विषयांचे तज्ञ शिक्षक श्री. खिरे संदीप विठ्ठलराव (गणित-श्री. सरस्वती भुवन हायस्कूल, जालना), श्री. मसलेकर सर (विज्ञान-सीटीएमके हायस्कूल, जालना), श्री. लांडगे सर (मराठी-आरएचव्ही , जालना) आदींची या समितीत प्रामुख्याने निवड करण्यात आली होती.











































