
श्रीराम वि.जा.भ.ज.प्राथमिक आश्रम शाळा पिंपळखुटाच्या विद्यार्थ्यांची शासनाला मागणी.
यवतमाळ / दारव्हा (प्रतिनिधी):- इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन परिपत्रक क्रमांक विभशा २०२० प्र.क्र.३०४विजाभज २.१ऑक्टोबर२०२१ च्या परिपत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२१- २२ राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५वी ते१२वी पर्यंत व शहरी भागातील इयत्ता ८वी ते१२वी पर्यंत चे वर्ग सुरक्षित पणे सुरू करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या की,४ आॅक्टोबर २०२१रोजी पासून वसतिगृह तथा शाळा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असतांना श्रीराम विजाभज प्राथमिक आश्रम शाळा पिंपळखुटा ता. दारव्हा जी.यवतमाळ येथील वर्ग ५ते ८वी चे विद्यार्थी दि.४आॅक्टोबर २०२१ ला शिक्षणापासून व वस्तीगृहाच्या सोयी सुविधेपासून पहिल्याच दिवशी वंचित राहिले आहे.याचे कारण असे की,श्रीराम विजाभज प्राथमिक आश्रम शाळा पिंपळखुटा ता. दारव्हा जी.यवतमाळ ही शाळा शासनाच्या शासन निर्णय १५जानेवारी २०२०नुसार नियमबाह्य ४००(चारशे)किलोमीटरच्यावर स्थलांतरित केली आहे.याकरिता गावकऱ्यांनी तक्रार केली असता इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री महोदय अा.विजय वडेट्टीवार साहेबांनी दि.९आॅगष्ट२०२१ला पुढील सुनावणी पर्यंत स्थगीती देण्यात आली होती. स्थगीतीचे पत्र सहायक आयुक्त यवतमाळ यांना व उपायुक्त अमरावती यांना मुंबई येथून प्राप्त न झाल्यामुळे ही शाळा आजही इटकळ ता.तुळजापूर जी. उस्मानाबाद ४००किलोमीटर अंतरावर स्थलांतरित करण्यात आली आहे व तिथेच आज रोजी सुरू आहे. त्यामुळे पिंपळखुटा ता. दारव्हा जी.यवतमाळ येथील विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित झाले आहे व वस्तीगृहाच्या सोयी सुविधेपासून तसेच भौतिक व नैतिक सोयी सुविधे पासून वंचित झालेले दिसून येत आहे.
तरी सहाय्यक आयुक्त यवतमाळ यांनी श्रीराम विजाभज प्राथमिक आश्रम शाळा पिंपळखुटा ता. दारव्हा जी.यवतमाळ ही शाळा,कर्मचारी,शैक्षणिक,भौतिक व नैतिक सोयी सुविधा तत्काळ सुरू करून द्याव्यात.अन्यथा आम्ही विद्यार्थी,पालक तथा गावकरी आर टी ई नुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा गुन्हा नोंदवून न्याय मागणार आहोत तसेच उपोषणाला सुद्धा बसणार आहोत जर शासन प्रशासन एवढ्याने मानले नाही तर सहाय्यक आयुक्त यवतमाळ यांच्या कक्षात शाळा भरवू असे जगदीश राजू चव्हाण,
सुरेश रूपसिंग चव्हाण,अशोक महादेव चव्हाण,किशोर शेषराव चव्हाण,उदल सुखदेव चव्हाण,विष्णू जगताप,शंकर वसंता चव्हाण व समस्त गावकरी (पिंपळखुटा),पालक,विद्यार्थी तसेच बिमोद विठ्ठलराव मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.










































