
वंचित बहुजन आघाडी चे तहसीलदारांना निवेदन
हनिफ शेख ,
अंढेरा/प्रतिनिधी : तालुक्यात गुलाबी चक्रीवादळाच्या अतिवृष्टीमुळे बहुतांशी पिके नष्ट झाली आहे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा व खचलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा आधार द्या अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष सविताताई मुंडे त्यांच्या निर्देशांक नुसार दिलेल्या निवेदनात वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नमूद केले आहे की तालुक्यात २६ ते २८ सप्टेंबर गुलाबी चक्रीवादळाने तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली सततच्या पावसामुळे सोयाबीन मूग उडीद कापूस पिके नष्ट झाली आहे प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करून देऊळगाव राजा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा व हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या अशी मागणी करण्यात आली निवेदन देताना तालुकाध्यक्ष उद्धव वाकोडे,प्रल्हाद कदम,संदीप खरात,मधुकर खरात,दीपक सोनपसारे,संजय सोनपसारे,अनिकेत झोटे,अक्षय झोटे,मच्छिंद्र भालेराव,किरण कदम,विनोद पटावकर आदींची उपस्थिती होती











































