
रवि अन्ना जाधव
देऊळगाव राजा , (प्रतिनिधी) :- भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)मध्ये काम करावे, असे अनेकांचे स्वप्न असते. पण हेच स्वप्न जर उराशी बाळगले तर नक्कीच पूर्ण होते, असा संदेश नुकताच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला मिळाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील २५००लोकसंख्या असलेल्या शिवणी आरमाळ येथील एका तरुणाने इस्रोत भरारी घेतली आहे. विशेष म्हणजे भारतातील एकूण ८९० जनां मधून यासाठी केवळ १३५ विद्यार्थाची निवड करण्यात आली. त्यात निखिल ३५व्या क्रमांकावर वर उत्तीर्ण झाला आहे.. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये बुलडाण्यातुन तो एकमेव तरुण आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
निखिल दत्तु आरमाळ असे या तरुणाचे नाव आहे. ते दे.राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथे राहतात. निखिल ने जिद्दीने शिक्षण घेत थेट इस्रोपर्यंत मजल मारली आहे..
विशेष म्हणजे निखिलचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाडळी शिंदे येथे झाले होते.
निखिल ने एम टेक पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने इस्रोमध्ये काम करायचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यानुसार त्याने त्या दिशेने प्रयत्न सुरु केले.
२०११… साली बारावी मध्ये ८७….टक्के गुणांसह पास झाल्यावर निखिल पुढील शिक्षणासाठी पुणे येथे बी टेक साठी गेला. तेथे ….२०१७.. साली तो ..७..०…..ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाला. त्यानंतर दिलेल्या गेट परीक्षेत संपूर्ण भारतातून त्याने .८९७… वा क्रमांक पटकावला त्यानंतर त्याची आय टी आय चेन्नई येथे एरो स्पेस साठी त्याची निवड झाली.
सन.२०१९मध्ये निखिलने इस्त्रोसाठी अर्ज केला. जिद्द आणि चिकाटी यामुळे अखेर निखिल ची सप्टेंबर २०२१ ला इस्रोमध्ये संशोधक अभियंता…(शास्त्रज्ञ )या पदासाठी निवड झाली आहे.तसेच निखिल चे वडील दत्तात्रय आरमाळ हे सद्या पाडळी शिंदे येथिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथिल निखिल आरमाळ ची निवड झाल्याने शिवणी आरमाळ व प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेल्या पाडळी शिंदे ग्रामस्थ यांच्या सह संपूर्ण जिल्ह्यातून निखिल सह परिवाराचे कौतुक होत आहे.











































