Home विदर्भ सेनेच्या आंदोलनाचा ठरला फुसका बार ढान्या वाघाच्या डरकाळीला घाबरेना अनवाने…?

सेनेच्या आंदोलनाचा ठरला फुसका बार ढान्या वाघाच्या डरकाळीला घाबरेना अनवाने…?

894

कार्यशाळा उपअभियंता रविंद्र अनवाने यांच्या गैरप्रकारांची चौकशीची मागणी…!

      ✍🏻  विनोद पञे – यवतमाळ

           अमरावती महानगरपालिका ही महाराष्ट्रातील मोठी नगरपालिका म्हणुन ओळख निर्माण केली आहे. परंतु विविध गैरप्रकारामुळे अमरावती महानगरपालिका वादाचा विषय ठरली आहे.

   कार्यशाळा उपअभियंता रविंद्र अनवाने यांनी मनपा अधिकाऱ्याच्या वाहन चालकाना हातासी धरून वाहन इंधन चोरीचा गोरख धंदा चालवत ‘ हात धुवून’ घेत असल्याचा आरोप केला जात आहे. अमरावती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सुविधेकरिता 60 वाहन चालक ठेवले आहे. त्यातील काही काम करतात तर काही घर बसल्या पगार घेत असुन त्यातुन अनवाने कमिशन डकारत असल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. मनपाचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या वाहनावर सुमारे 50 लाख रुपये महिना इंधन खर्चासाठी केला जातो आहे. अशी तक्रार घेवून युवा सेना जिल्हा प्रमुख राहुल माटोडे यांनी मनपा आयुक्त प्रशांत रोडे याना केली.

परंतु मनपा कार्यशाळा उपअभियंता रविंद्र अनवानेवर मनपा प्रशासनाचा वरहस्त असल्यामुळे युवा सेना जिल्हा प्रमुख राहूल माटोडेच्या तक्रारीला केराची टोपली दाखवून त्यांच्या आंदोलनाचा फुसका बार उडविला गेला. अश्याच पध्द्तीच्या घडामोडी जर पक्षात घडत गेल्या तर भविष्यात पक्षाला ह्याची मोठी किंमत चुकवावी लागतील, अशी प्रतिक्रिया दस्तुरखुद्द कार्यकर्त्याकडुन उमटू लागली आहे. गांधारी बनलेल्या मनपा प्रशासनाला आर्थिक गौडबंगाल दिसेनासा न  झाल्याने  त्यावर  वरिष्ठ स्तरावर ‘ तिसरी आख ‘ बसवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.   नादुरुस्त घंटागाड्या ,जेसीबी आणि फॉगिंग मशीनचे डिझेल नेमके कुणाच्या घशात गेले? अशा संशोधनात्मक प्रश्न उपस्थित होत आहे.

 सध्या पावसाळ्याचे दिवस असुन, शहरामध्ये डेंग्यू, मलेरिया सारख्या आजाराचा फैलाव झाला आहे. त्यामुळे फॉगिंग करणे, जेसीबीच्याव्दारे साफसफाई करणे आदी मागणी सदस्याकडुन होत आहे.

वरचेवर अनवानेवरती तक्रारी होत असताना कारवाई का होत नाही ? अनवानेवरती नेमका वरहस्त कुणाचा ?का, पडले अनवाने सेनेला भारी ? का,सेनेची ताकद जिल्ह्यात लोप पावली..!,का, अनवाने यांनी ढाण्या वाघाला ‘ पाळीव ‘ तर केला नाही ना..!

   अश्या नाना- विविध चर्चेला उधाण येवु लागले आहे.