Home मुंबई दगडखैर थातूर मातुर तोडक कारवाई ची नौटंकी बंद करा. अन्यथा...

दगडखैर थातूर मातुर तोडक कारवाई ची नौटंकी बंद करा. अन्यथा आंदोलन करणार “आजाद समाज पार्टीचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांचा आंदोलनाचा इशारा”

1128

(“पी उत्तर विभागात अवैध बांधकाम जोरात तक्रारी ला मिळतेकेराची टोपली, “,)

मनपा आयुक्त मकरंद दगड खैर

 

मुंबई (प्रतिनिधी ) काही महिन्या पूर्वी मालवणी मध्ये इमरात दुर्घटना मध्ये अवैध बांधकामामुळे  हाकनाक बळी गेले असता ना अजुनपण मनपा प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी असून हे सर्व आर्थिक लाभामुळे घडत असून या घडणे संदर्भात न्यायालीयण चौकशी  चालू असताना सुद्धा राजकीय  पाठिंब्यामुळे रोज अवैध बांधकामचा  उत आला असून  नवनियुक्त मनपा आयुक्त मकरंद दगड खैर  हे  विभागात  पत्र्याच्या कामावर कारवाई करत असून ती कामे आर्थिक लाभापोटी पुन्हा चांगल्या स्वरूपात उभी राहत असून याबद्दल जनतेच्या मनामध्ये शंके ची पाल चुकचूकत आहे.

मिळालेल्या माहिती नुसार दीपक शर्मा सहाय्यक अभियंता यांची दिनांक 29 /4/2021रोजी के/पश्चिम विभाग मध्ये बदली चे कार्यलीय आदेश निघून सुद्धा आजवर कुणाच्या वरदहस्त मुळे पी उत्तर विभागातून पदमुक्त केलें जात नाही शर्मा यांच्या सी बी चौकशी च काय झालं अखेर पाणी कुठं मुरतंय फडणवीस सरकार असो या ठाकरे सरकार  अखेर चौकशी च्या पत्राला केराची टोपली मिळते  यांच्या आर्थिक लाभापोटी  निष्पाप हकनाक  बळी जातअसून या सर्व बाबींचा जवाब  विचारण्यासाठी आजाद समाज पार्टी चे राष्ट्रीय प्रमुख ऍड भाई चंद्रशेखर आजाद रावण  यांच्या स्टाईल ने पी उत्तर विभाग वर आंदोलन केलें जाईल  असे वाघमारे यांनी आपला जनतेप्रति असलेला संताप व्यक्त केला. विशेष वार्ता म्हणजे दीपक शर्मा ने तर आधीच  भाव वाढ केली असताना मकरंद दगड खैर  यांनी तर आवाच्या सव्वा मागणी करीत असल्याचे दबक्या आवाजात ठेकेदार बोंब मारत असून ज्या  कामाची रक्कम मिळालीय त्यालाचा ग्रीन सिग्नल मिळत असून तक्रारदार यांच्या तक्रारीला पी उत्तर विभाग कार्यालयात केराची टोपली मिळत असून कायदा सर्रास पणे धाब्यावर बसवत असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्यां मध्ये ओरड सुरु आहे.मालाड पी उत्तर विभागातील अधिकाऱ्याच्या आशिर्वादामुळे राजरोसपने अवैध बांधकामे जोरात सुरु असून या मस्तवलेल्या लचखोर अधिकाऱ्यांनी केवळ पैश्या पोटी बांधकाम ठेकेदारणा  भुमाफियाना मोकळे रान करुन ठेवले आहे संजोग कबरे गेल्यावर काहीतरी बदल होईल अशी अपेक्षा असताना सुद्धा मकरंद दगड खैर  मनपा पी उत्तर विभाग  वॉर्ड ऑफिसर यांनी सुरवातीला तोडक कारवाई दाखवून ठेकेदारला आवाच्या सव्वा रक्कम  माघून  बांधकामला  खुलेआम समर्थन देत असताना स्पष्ट दिसून येत असून मालवणी मध्ये राठोडी,गाव,मालवणी चर्च,पाठारे वाडी चिकुवाडी  मढ एरगल, आजमी नगर, खारोडी गाव या विभागात अवैध बांधकामं जोरात सुरु आहेत.आज पर्यंत पी/उत्तर विभाग आर्थिक लाभापोटी झोपेचं सोंग घेत आहे.राठोडी मार्वे रोड पेट्रोल पंप च्या बाजूचे इंडियन मोटर गॅरेज वर काही दिवसापूर्वी तोडक कारवाई झालेली मात्र ते गॅरेज पुन्हा अधिक सुसज्य निर्माण झाले. जनकल्याणनगर येथील सुपर मार्ट ची तोडक कारवाई झाल्यावर ते अधिक चांगल्या स्वरूपात उभे राहतेच कसे असा प्रश्न पडतो. मालवणी चर्च येथील बाबू पाटील बिल्डर कडून गावठाण च्या नावाखाली  भली मोठी 4मजली इमारत आर सी सी ची उभी राहतात यामाघे मनपा प्रशासनाला लाखो रुपये मिळतात वेलकणी विला महावीर मेडिकल च्या पाठी माघे मालवणी चर्च मार्वे रोड मालाड पश्चिम मुंबई 95 या ठिकाणी भव्य अशी इमारत कुणाच्या आशीर्वादाने उभी राहत असून एकीकडे पत्र्या च्या शेड वर थातूर मातुर कारवाई दाखवायची आणि दिशाभूल करायची ही पद्धत मकरंद दगड खैर  यांनी अवलंबून विभागात  अवैध बांधकामे करण्यासाठी खुले समर्थन  भुमाफिय व ठेकेदार यांना मिळत आहे. कामाची भली मोठी रक्कम मिळत असल्यामुळे इमारत व कारखाना विभागाकडून अवैध बांधकामावर कोणतीही कार्यवाही केली जात नाहीं,

 तक्रारी केलेल्या माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते यांच्या तक्रारीला “केराची टोपली ” मिळत असल्याचे कार्यकर्ते यांचे म्हणणे असून या बाबत तीव्र संताप व्यक्त करत आजाद समाज पार्टीचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी मनपा प्रशासनाविरुद्ध आंदोलनाचा  इशारा दिला असून तात्काळ विभागातील चालू असलेले अवैध बांधकामे तात्काळ निष्काशीत करावे व होणाऱ्या अवैध बांधकामला पायबंद घालावा  या मागणी करिता मनपा पी उत्तर विभाग कार्यालया समोर आसपा च्या वतीने मोर्चा धडकणार असून   विभागातील  विविध नागरी सुविधे बाबत  आवाज उठवणार असल्याचे सुरेश वाघमारे यांनी वर्तमान पत्राच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.