Home वाशिम वाशिम येथील पाटणी चौकात बॉम्ब सदृश्य बेवारस बॅग मिळाल्याने उडाली एकच खळबळ

वाशिम येथील पाटणी चौकात बॉम्ब सदृश्य बेवारस बॅग मिळाल्याने उडाली एकच खळबळ

575

 

वाशिम पोलीस दलाची यशस्वी रंगीत तालीम

फुलचंद भगत
वाशिम:-दि.२६ सप्टेबर रोजीच्या सकाळी 10/45 वा दरम्यान नियंत्रण कक्ष वाशिम येथे एका इसमाचा कॉल
आला पाटणी चौक येथे मनिष हार्डवेअर समोर एक काळी लावारीस बॅग असुन त्यामधुन एक
काळी वायर बाहेर आली आहे .बॅग बॉम्ब सदृश संशयास्पद दिसुन येत आहे ,असा कॉल आल्यावर नियंत्रण कक्ष वाशिम येथुन पोलीस स्टेशन वाशिम शहर व वरिष्ठ अधिकारी यांना
माहीती देण्यात आली असता पोलीस स्टाफ तात्काळ पोहचला त्याच प्रमाणे बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले.सदर रोडवरील वाहतुक पाटणी चौक व अकोला नाका येथुन वळविन्यात येवुन तेथील जागा निर्मनुष्य करण्यात आली. थोड्याच वेळात बिडीडीएस पथक प्रमुख पोउपनी सुळे हे त्याचे सहकारी 1) सत्यप्रकाश सुपारे 2) अजय घाटोळे . 3) राहुल पाटील 4) दशरथ ढोके 5) गजानन मुंडे 6) किशोर डोळसे 7) शरद वाटाणे 8)संतोष अंभोरे 9) गणेश भिसे , श्वान प्रिन्स व स्टेफी यांचेसह पोहचले. त्याचप्रमाणे नगर परिषद वाशिम अग्निशामक दल सुध्दा पोहचले.
बिडीडीएस पथकाने प्रथम सदर जागेची लांबुन पाहणी केली व नंतर त्याचे कडील असलेल्या शोध उपकरनांच्या साहाय्याने बॅगेची पाहणी केली त्याच प्रमाणे स्नीफर डॉग
च्या साहाय्याने तपासणी केली.बॅगेमध्ये कोणत्याही प्रकारचे स्फोटक अथवा गावठी बाँम्ब नसल्याची खात्री झाल्यानंतर रिमोट हँडलिंग मेथड ने बॅग उचलुन नाश करण्यासाठी बाँम्ब शोधक व नाशक पथकाचे वाहनात घेवुन गेले. सदर ठिकाणी सुरुवातीला नागरीकांच्या मनात घबराहट व कुतुहल निर्माण झाले पोलीसांचे यशस्वी ऑपरेशन बघुन सर्वानी टाळ्या वाजवुन
अभिनंदन केले.
सदरची मॉक ड्रील ही होणा-या संभाव्य अतीरेक्ती हल्याच्या अनुषंगाने वाशिम पोलीस दलाची व प्रशासनाची तयारी व कार्यक्षमता परीक्षणासाठी करण्यात आलेली
होती .सदरची माँक ड्रिल ही वाशिम जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मा. बच्चन सिंह सो.जिल्हा पोलीस अधिक्षक वाशिम व मा.अप्पर पोलीस अधीक्षक मा .गोरख भामरे सो.वाशिम यांचे मार्गदर्शनात मा. यशवंत केडगे , उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम , धृवास बावनकर पोलीस निरीक्षक बीडीडीएएस पथक प्रमुख पोउपनी प्रविण सुळे , सपोनी सागर दानडे, सपोनी अल्का गायकवाड, पोउपनी अनिल पाटील, पोउपनी अनिल मानेकर, पोउपनी धनराज
तायडे , आरसिपी पथक , पोलीस स्टाफ यांचे उपस्थीतीत आणी नगर परिषद अग्निशामक विभाग यांचे सहकार्याने पार पडले.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206