Home वाशिम मंगरुळपीर येथे भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन

मंगरुळपीर येथे भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन

161

 

OBC समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकारचा भाजपाने केला जाहीर निषेध

(फुलचंद भगत)
वाशिम:-मंगरुळपीर भाजपा चे वतीने दि.१५ सप्टेबर रोजी ओबीसी चे न्याय हक्कासाठी आंदोलन पुकारण्यात आले.या आंदोलनामध्ये ओबिसी समाजाचा विश्वासघात करणार्‍या आघाडी सरकारचा जाहीर निषेधही भाजपाच्या वतीने करण्यात आला.
ओबीसी आरक्षणासाठी मा. न्यायालयाने मागितलेला इंपेरिकल डेटा अगोदर उपलब्ध करून दिला नाही आणि न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर ते पूर्वरत करण्यासाठी आयोग गठीत करून इंपेरिकल डेटा गोळा करण्यात कुचराई केली आता पुन्हा न्यायालयाने आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलता येणार नसल्याचा निकाल दिल्याने स्थानिक स्वराज संस्थाच्या पोटनिवडणुका आरक्षणाविना पार पडण्याची प्रकिया सुरु झाली आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजानंतर ओबीसी समाजाचे सुद्धा हक्काचे आरक्षण गेले आहे. सरकार केवळ वसुली करण्यात व्यस्त राहिल्याने सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत असे मत भाजपाच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केले.या प्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य पुरुषोत्तम चितलांगे यांचेसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

प्रतिनीधी-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206