Home मराठवाडा कलियुगात आसुरी वृत्ती बोकाळली;जावयाने सासऱ्याला पाठविले यमसदनी…!

कलियुगात आसुरी वृत्ती बोकाळली;जावयाने सासऱ्याला पाठविले यमसदनी…!

346

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालणा – कलियुगी दुनियेत आसुरी वृत्ती दिवसेंदिवस बोकाळत चालली असून नात्यातील लोकच एकमेकांच्या जीवावर उठले आहेत.भाऊभावांचा वैरी,बापलेकांत दुश्मनी,मामा-भाचेतील शतृत्व हे आपण ऐकत आलो आहोत… परंतु आता चक्क जावईच सासऱ्याच्या मुळावर उठला असून जावयाने सासऱ्याला साथीदाराच्या मदतीने नदीत बुडवून मारून टाकल्याची घटना घडल्याने परिसर सुन्न झाला आहे.जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण येथील बाणा नदीच्या पात्रात सोमवारी,१३ सप्टेंबर रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.तत्पूर्वी घनसावंगी पोलिस ठाण्यात रमेश चिमाजी भारसाखळे रा.खांडवी,ता.परतूर हे बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.बाणा नदीत मृतदेह आढळून आल्याने या संदर्भात ग्रामस्थांनी कुंभार पिंपळगाव येथील पोलिस चौकीत माहिती दिली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा आणि नदीतील या मृतदेहाचा कुठे संदर्भ जुळतो का ? या बाबतीत पोलिसांनी छानबिन केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली.पोलिस निरीक्षक नितीन पतंगे,पोउनि.युवराज टाकसाळ यांनी जलदगतीने तपास करून या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.या संदर्भात राजेश भारसाखळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावई अरूण काशिनाथ आव्हाड याने साथीदाराच्या मदतीने सासरे रमेश भारसाखळे यांचा खून केला असल्याची माहिती पोलिसांना दिली.त्यानुसार घनसावंगी पोलिसांनी आरोपी अरूण काशिनाथ आव्हाड याला पुणे येथे पथक पाठवून बेड्या ठोकल्या आहेत.तर त्याच्या दुसऱ्या साथीदारास पकडण्यासाठी पोलिस पथक बाहेर पडले आहे.याप्रकरणी घनसावंगी पोलिसांनी गुरनं.३४२/२०२१ कलम ३०२,३४ भादविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन पतंगे पोउनि.टाकसाळ,पोहेकाॅ.रामकृष्ण कुटे, पोलिस नाईक रामदास केंद्रे, पोलिस कर्मचारी नवनाथ राऊत, गोपाळ दहीवाळ,गुसिंगे,नागलौत,वैराळ हे करीत आहेत.