
मुलीच्या काकाची हत्या ,
अमीन शाह
बुलडाणा ,
जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे काही आरोपींनी लग्नाला नकार दिला म्हणून मुलीच्या काकाचा खून व वडीलास गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली या संदर्भात सय्यद अमीन सय्यद अफसर यांनी आज एक सप्टेंबर सकाळी 02:34 मिनिटांनी जळगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे , या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की मृतक नूरखान समशेर खान , जखमी रसूलखान , व चारही आरोपी आम्ही जामोद येथील एकाच मोहल्ल्यात राहतो जखमी रसूलखान यांची मुलगी ही दहावीत शिकत असून तिला शाळेत जाताना आरोपी शेख सद्दाम हा नेहमी तिला त्रास देत असे तेव्हा मृतक नूरखान यांनी त्याला समजून सांगितले होते , शेख सद्दाम याचे वडील आरोपी शेख नजीर यांनी काही दिवसापूर्वी मुलीच्या वडिलांकडे त्यांच्या मुलासाठी लग्ना करिता मागणी घातली होती परंतु मुलीच्या वडिलांनी त्यांची ती मागणी मान्य केली नाही त्या मुळे मंगळवारी संध्याकाळी शेख नजीर यांनी मुलीचे काका रसूलखान यांना मुलीच्या संबंधी विचारणा करण्यासाठी बोलावले असता त्यांनी नकार दिला यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला शेख सद्दाम यांच्या घरासमोरच शेख बशीर यांनी नूरखान यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली ही मारहाण सोडवण्यासाठी रसूलखान आला असता आरोपी शेख सद्दाम यांनी चाकूने पोटावर डोक्यावर मांडीवर वार केले आरोपी शेख नजीर यांनी मयत नूरखान वर वार केले तसेच वाद निर्माण केला शेख सद्दाम यांच्या घरासमोरच शेख बशीर यांनी नूरखान यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली ही मारहाण सोडवण्यासाठी रसूलखान आला असता त्यास ही आरोपींनी जबर मारहाण केली नूरखान व रसूल खान यांना ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी नूरखान याला मयत घोषित केले . मृतक नूरखान समशेर खान तर रसूल खान यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खामगाव येथे रेफर करण्यात आले आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 302 , 307 , 34 भारतीय दंडविधान नुसार गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने पीएसआय सचिन वाकडे करीत आहे .











































