Home मराठवाडा पर्यावरण,स्त्री सशक्तीकरणासाठी प्रणाली चिकटेचे सायकलवरून महाराष्ट्र भ्रमण

पर्यावरण,स्त्री सशक्तीकरणासाठी प्रणाली चिकटेचे सायकलवरून महाराष्ट्र भ्रमण

297

११ हजार किमीचा प्रवास करून जालन्यात दाखल झाल्यानंतर यंग जायन्ट्सने केले जोरदार स्वागत

जालना – लक्ष्मण बिलोरे

– यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याशा गावातून प्रणाली विठ्ठल चिकटे ही साहसी व ध्येयवेडी तरुणी महाराष्ट्र भ्रमणासाठी निघाली आहे. महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धन जनजागृती, सायकलिंगचा प्रचार, स्थानिक परिस्थिती व मानसिकतेचा अभ्यास हे ध्येय उराशी बाळगून प्रणालीचा प्रवास सुरू आहे. आज शनिवारी (ता. 28) सायंकाळी ती सुमारे 11 हजार किमीचा प्रवास करत जालना शहरात दाखल झाली असता यंग जायंट्स ग्रुप ऑफ जालनाच्यावतीने तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी यंग जेन्ट्स चे अध्यक्ष बॉबी अग्रवाल, सचिव शुभम पाटील, उपाध्यक्ष अक्षय जैन, सदस्य अश्विनी धन्नावत पियुष अग्रवाल, हर्ष अग्रवाल, प्रद्युम्न मानधानी, जय शर्मा, अरव भक्कड, सखी भक्कड, कुबेर धन्नावत, प्रथम अग्रवाल, अनिकेत भंडारी यांनी प्रणालीचे स्वागत केले आणि ती करत असलेल्या पर्यावरण संरक्षण, महिला सशक्तिकरण या कार्याला सलाम केला.
अवघ्या २१ वर्षीय प्रणालीने समाज कार्यातील पदवी मिळविली आहे. तिच्या घरची . परिस्थिती बेताची आहे. आई व वडील शेती करतात. तर दोन बहिणी देखील आहेत. सभोवतालचे वाढते प्रदूषण, तापमान वाढ, वातावरण व ऋतुचक्र बदल यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या या जाणिवेतून आणि कोरोना या महामारीकडून प्रत्यक्ष पर्यावरण व्हास शिकवण या गोष्टींमुळे प्रणालीने सायकलवरून महाराष्ट्र भ्रमंती करण्याचा उपक्रम हाती घेतला. ती प्रवासात नेमके काय करते? ते म्हणजे, सद्या सायकल ने प्रवास करत ती आदिवासी, ग्रामीण, शहरी भागातील लोकांना व तरुणांना भेटते त्यांच्याशी संवाद साधणे. स्थानिक संस्था, शाळा, आणि सरकारी यंत्रणामध्ये भेटी देऊन जनजागृती करणे व माहिती पोचविणे, शक्य तितके लोकांशी त्या त्या भागातील समस्या बाबत चर्चा करणे, आरोग्या बाबत जनजागृती आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालवा हा संदेश देते. प्रणालीचा हा सायकल प्रवास २० ऑक्टोबर २०२० ला सुरु झाला. आतापर्यंत तिने विदर्भ, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम बुलडाणा करून खान्देश जळगाव, धुळे, नंदुरबार, उत्तर महाराष्ट्र नाशिक, शहापूर, पालघर, वसई, ठाणे, रायगड, औरंगाबाद दिल्यानंतर जालना जिल्ह्यासाठी तिचे आज शनिवारी जालन्यात आगमन झाले असून रविवारी ती सायंकाळी बीड जिल्हाकडे रवाना होणार आहे. जिल्ह्यात सुधागड व तालुक्यातील उद्धर येथे आली आहे. या ६ महिन्यात ७९२५ किमीचे अंतर गाठले आहे. कमीत कमी ५० ते जास्तीजास्त १२५ किमीचा प्रवास ती दिवसाला करते. सभोवतालचे वाढते प्रदूषण, तापमान वाढ, वातावरण व ऋतुचक्र बदल यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या या जाणिवेतून आणि कोरोना या महामारीकडून प्रत्यक्ष पर्यावरण व्हास शिकवण या गोष्टींमुळे प्रणालीने सायकलवरून महाराष्ट्र भ्रमंती करण्याचा उपक्रम हाती घेतला.
वायू ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी शक्य ती कामे सायकलने करूया. प्लास्टिक बाटल्यांचा वापर टाळूयात. घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बॉटल सोबत ठेवू या. परिसरात झाडे लावूया व जगवूया. अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करूया. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवूयात. पाणी बचत व पाणी जिरवा या कामात सहभाग घेऊया. या सर्व प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त व्यक्तींना सहभागी करूया, असा संदेश प्रणाली या सायकल प्रवासात देत असल्याची माहिती यंग जायन्ट्स ग्रुप जालनाचे अध्यक्ष बॉबी अग्रवाल यांनी दिली.