Home मुंबई ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर पत्रकार मोईन सय्यद...

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर पत्रकार मोईन सय्यद यांची निवड!

205

सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन ,

मुंबई ,

भाईंदर: भारतातील अग्रगण्य असलेली एकमेव पत्रकार मित्रांची संघटना ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर साप्ताहिक लोकहीत न्युजचे संपादक मोईन सय्यद यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष यासीन पटेल यांनी केली असून या नियुक्तीस संघटनेचे विश्वस्त गणेश कोळी आणि अतुल होणकळसे यांनी संमती दिली आहे.
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल ही भारतातील एकमेव पत्रकारांची संघटना आहे जी पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कार्यरत आहे. पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी ही संघटना देशातील प्रत्येक पत्रकार बंधूंच्या पाठशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे.
संघटनेचे अध्यक्ष यासीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर मोईन सय्यद यांची नियुक्ती झाली असून जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना योग्य त्या माध्यमातून सोडविण्याचा आणि संघटना बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे पत्रकार मोईन सय्यद यांनी सांगितले आहे.
ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी मोईन सय्यद यांचे अभिनंदन केले असून त्यांना भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.