Home विदर्भ हिंगणघाट भूषण पुरस्काराच्या मानकरी ठरला ध्येयवेडा रुग्णमित्र गजू कुबडे 

हिंगणघाट भूषण पुरस्काराच्या मानकरी ठरला ध्येयवेडा रुग्णमित्र गजू कुबडे 

107

प्रतिनिधी:- येरला, हिंगणघाट

वर्धा –  दिवस असो की रात्र,ऊन वारा पाऊस,थंडी याची पर्वा न करता गोरगरीब रुग्णासाठी तत्परतेने धावून जाणारा येथील रुग्णसेवेला समर्पित गजूभाऊ कुबडे यांना आज दि 29 आगस्टला येथील शितला माता देवस्थान येथे जय भवानी माता या सामाजिक संस्थेतर्फे हिंगणघाट भूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार आमदार समीर कुणावार, वणा बँकेचे अध्यक्ष डॉ निर्मेश कोठारी,वनश्री दिगांबर खांडरे ,डॉ स्नेहल चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

आपल्या सत्काराला उत्तर देतांना गजुभाऊ कुबडे यांनी आपली खंत व्यक्त केली.रुग्णमित्र म्हणून काम करीत असतांना येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अपुऱ्या सोयी सुविधेच्या अभावी अनेक रुग्णांना नाईलाजाने बाहेरगावी उपचारासाठी जावे लागते याची खंत गजू कुबडे यांनी व्यक्त केली.यावेळी बोलतांना गजुभाऊ म्हणाले,”शासनाच्या निधीतून एकाचवेळी ७ ऍम्बुलंस खरेदी करण्यावर निधी खर्च करण्यापेक्षा तो निधी हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या सोयी-सुविधेवर खर्च केला असता तर या रुग्णालयाचा पूर्णपणे कायापालट होऊन नेहमीसाठी जनतेच्या आरोग्यासाठी मदत झाली असती असा हितोपदेश करीत रुग्णमित्र गजू कुबडे यांनी हिंगणघाट गौरव पुरस्कार स्विकारतांना केला. यावेळी रुग्णमित्र गजू कुबडे यांनी आपल्या उद्बोधनातून रुग्णसेवेच्या आपल्या प्रदीर्घ कार्या विषयी उपस्थितांना माहिती दिली व या रुग्णसेवेसाठी सरकारच्या विविध उपक्रमांचा फायदा गोरगरीब,गरजू रुग्णाला करून देत आहे हे कार्य करीत असतांना मला मानसिक व आत्मिक समाधान मिळत असते व यामुळे मला या गरजूंचे जे आशीर्वाद मिळतात त्यामुळे हे रुग्णसेवेचे कार्य करतांना मला अधिक आनन्द मिळत असल्याचे त्यांनी आपल्या सत्काराला उत्तर देतांना सांगितले.