Home विदर्भ पुजा कंस्ट्रक्शन करत आहे कामगारांचे शोषण

पुजा कंस्ट्रक्शन करत आहे कामगारांचे शोषण

198

चार दिवस चा अल्टीमेटम नाहीतर बेमूदत संप

जय संविधान संगठन कामगारांना न्याय मिळण्यासाठी आक्रमक


मनिष गुडधे – जिल्हा प्रतिनिधी

अमरावती – आज दि. २५ आगस्ट २०२१ रोजी ‘जय संविधान संगठन’ चे जिल्हाध्यक्ष मेजर हिदायत खान यांच्या नेतृत्वात अमरावती मनपा उपायुक्त रवी पवार यांची भेट घेवुन पुजा कंस्ट्रक्शन कशाप्रकारे कामगारांची पिळवणुक शोषण करत आहे याची सविस्तर माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली व विविध मागण्या पुर्ण न झाल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आला. सविस्तर असे की, अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन निघणारा कचरा व मलमा डंम्पर प्रेसर द्वारे व ट्रक टिप्पर द्वारे उचलुन महानगरपालिका कडुन सांगण्यात येईल त्या ठिकाणी नेऊन टाकण्यासाठी मे. पुजा कंस्ट्रक्शन, प्रो. पा. नरेंद्र के. दफ्तरी प्रतिक-२, बाहुबली नगर, नागपुर रोड, वर्धा या कंपनी सोबत दि. १६/११/२०१६ रोजी ७+१+१ वर्षांसाठी विविध अटी व शर्ती नुसार करार केला आहे. करार केल्यापासुन तर आज पर्यंत या कंपनी वर कार्यरत कुशल व अर्धकुशल कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार नियमीत वेतन दिले जात नाही व वेतन मध्ये वाढ करण्यात आलेली नाही. कामावर असलेल्या कामगारांचे अद्याप पर्यंत EPF खाते काढलेले दिसत नाही. तसेच यांचे वेतन मान्यताप्राप्त राष्ट्रीयकृत बैंक द्वारे होत नाही. कामासाठी लावण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणी वेळोवेळी केली जात नाही तसेच त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रोटेक्शन किट उपलब्ध करुन दिल्या जात नाही. साफ सफाई चे काम अत्यावश्यक सेवेत असुनही कार्यरत कामगारांचे अपघाती व आरोग्य विमा काढण्यात आलेला नाही. प्रत्येक झोन मध्ये करारानुसार १० वाहने असायला पाहिजे परंतु दिवसेनदिवस घनकचरा वाढत असला तरी यात वाढ न करता उलट वाहनांची संख्या कमी आहे. तसेच ही वाहने भंगार खराब झाल्याने काम करणा-या कामगारांना आपला जीव मुठीत घेवुन काम करावे लागते.
सर्व वस्तुस्थितीचे अवलोकन केल्यास असे लक्षात येते की, मे. पुजा कंस्ट्रक्शन ही कंपनी कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण करत आहे. कंपनीचे लोक, “कामावरून काढुन टाकु, तुम्हाला जे करायचे आहे ते करा, मी कोणाला भीत नाही” अशा प्रकारच्या धमक्या देवुन कामगारांचे शोषण व पिळवणुक केली जात आहे.
हे शोषण व पिळवणुक थांबवण्यासाठी
1) सर्व कामगारांच्या वेतनात 30% वाढ करुन नियमीत वेतन देणे.
2) सर्व कामगारांना यूनिवर्सल अकाउंट नंबर UAN देण्यात यावा, तसेच EPF खाते कायद्याप्रमाणे करण्यात यावे, आतापर्यंतची एकुण रक्कम, रकमेचे दर याची संपुर्ण माहिती पारदर्शकपणे कामगारांना वेळोवेळी देणे.
3) कामगारांचा अपघाती व आरोग्य विमा काढणे.
4) कामगारांना शारीरिक इजा होवू नये म्हणून प्रोटेक्शन किट उपलब्ध करुन देणे.
5) सर्व कामगारांना आठवड्यात दोन सुट्या देणे.
6) भंगार-खराब कचरा उचलणा-या गाड्या बदलुन नवीन गाड्या उपलब्ध करणे आणि त्याचे व्यवस्थित मेंटनंस करणे.
7) कामगारांना ओळख पत्र देणे.
या मागण्या पुर्ण न झाल्यास अन्याय ग्रस्त कामगारांना न्याय देण्यासाठी संवैधानिक मार्गाचा अवलंब करुन बेमुदत संप करण्याचा इशारा जय संविधान संघटनेने दिला. यावेळी मेजर. हिदायत खान, मंगेश कनेरकर, एजाज़ अली, यश शिरसाट, किरण गुडधे, मा. लेफ्टिनेंट कमांडर डॉ. अलीम पटेल, अंकुश वानखडे, अ. रहीम राही, शामाईल खान, वसीम खान, सुनील खडसे, प्रमोद गायकवाड़, फिरोज़ खान, शे. कदीर, मों. आरिफ, नारायण चव्हाण, ईमरान खान, अब्दुल कलाम, अ. हमीद, मों. आरिफ, अ. मलिक, अजीज़ खान, मों शब्बीर, अ. जब्बार, राजू अहाके, सादिक भाई, शे. शकील, असलम रहेबर, सै. नसीम, ईमरान खान, शे. नौशाद, जावेद खान, वसीम खान, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार उपस्थित होते.