
हनिफ शेख
अंढेरा(प्रतिनिधी): – जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असलेले अंढेरा पोलीस स्टेशन ला नव निर्वाचित ठाणेदार पदी गणेश हिवरकर रुजू झाले आहे.
यावेळी मंडपगाव मा.उपसरपंच तथा राष्ट्रवादी तालुका सचिव राजू पठाण यांनी हिवरकर यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
अंढेरा पोलीस स्टेशन ला यापूर्वी अतिशय शिस्तबद्ध असलेलं आठवले ठाणेदार म्हणून कार्यरत होते परन्तु प्रशासकीय बदली मध्ये त्यांची रायपूर येथे बदली करण्यात आली व त्यांच्या जागी.आता नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक गणेश हिवरकर साहेब यांची नियुक्ती करण्यात आली.
हिवरकर साहेबांची एक वैचारिक,अतिशय शिस्तप्रिय व नैतीक मुल्य जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. यावेळी बोलतांना परिसरात कायदा सुव्यवस्था आबादित ठेवणार तसेच ग्रामीण भागात जनतेशी थेट संपर्क साधत पोलीस व जनता यांचे वैचारिक रित्या जवळीक साधणार जेणे जरून गावातील प्रत्येक छोट्या मोठ्या घटना कळायला सोपे जाईल असे मत गणेश हिवरकर यांनी व्यक्त केले.
माझ्या कार्यकाळात माझे कर्तव्य मी पूर्णपणे पार पाडेल व परिसरात होणाऱ्या गैर प्रकारावर नक्कीच अंकुश लावेल असे हि यावेळी ते बोलले.
यानिमित्त पो.रायटर उगले साहेब,राजू पठाण,(राष्ट्रवादी ता.सचिव),महेमुद शेख, संतोष माळी(ताअध्यक्ष. भ.वी.जा),संपादक आदिल पठाण उपस्तीत होते.











































