
प्रतिनिधि
सरकारने छकडा गाडी शर्यतीत कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी उद्या रविवारची झरे जि. सांगली येथील शर्यत होणारच आहे. ही शर्यत आयोजित करणाऱ्या लोकनेते गोपीचंद पडळकर यांच्या सोबत परभणी जिल्ह्यातील छकडा गाडी शर्यत प्रेमी असल्याची माहिती धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.
झरे जि सांगली येथे राज्यव्यापी छकडा बैलगाडी शर्यत उद्या शुक्रवारी होत आहे. या शर्यतीत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत छकडा बैलगाडी स्पर्धक स्पर्धा स्थळी दोन दिवसापासूनच पोहोचले आहेत. कालपासून ही शर्यत होऊ नये म्हणून शासनाने मोठा बंदोबस्त त्या परिसरात लावलेला आहे. स्पर्धेच्या ठिकाणी जाणाऱ्या सर्व रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे. एवढे असतानाही ही शर्यत मात्र होणार असल्याचा दावा संयोजक आमदार गोपीचंद पडळकर आणि त्याच्या समर्थका कडून केला जात आहे. परभणी जिल्ह्यातील गोपीचंद पडळकर समर्थकांनाही ही शर्यत होईलच असा विश्वास असून आम्ही सर्व जिल्हा वाशिय शर्यत व्हावी याच बाजूने असल्याची माहिती सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.











































