
जालना- लक्ष्मण बिलोरे
युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी मराठा समाजाचा अंत न बघता मराठा समाजाला परिपक्व व सर्वसमावेशक आरक्षण कसे देता येईल याविषयी निर्णायक भूमिका घ्यावी, तुझंमाझं न करता मराठा समाजाच्या हिताचे जे निर्णय राज्य सरकारच्या हातात आहे ते राज्य सरकारने तात्काळ मार्गी लावावे,
आणि आता आश्वासन नको तर कृती हवी,
आतापर्यंत राज्य सरकारने खुप आश्वासने दिली यापुढे असली पोकळ आश्वासने चालणार नाही जो पर्यंत ठोस निर्णय सरकार घेणार नाही तोपर्यंत आता सरकारला मराठा समाज कुठलीही दया दाखवणार नाही, मी मराठा समाजाचा सेवक आहे आणि बहुजनांचे नेतृत्व करत आहे त्यामुळे मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही,
आज पर्यंत छत्रपती युवराज संभाजीराजे हे संयमी या सरकारने बघितलेले आहे पण येणाऱ्या काळात आक्रमकपणे समाजाची भूमिका मांडणार यासाठी नांदेड येथून पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार सुरू करत आहोत, त्याचबरोबर सरकारला संयमाची व शांततेची भाषा कळत नसेल तर मराठा समाजाला आरक्षण आणि इतर मागण्या समाजाच्या पदरात पाडून घेण्यासाठी मी स्वतः आजाद मैदान या ठिकाणी लाक्षणिक उपोषण किंवा समाज सांगेल तोपर्यंत उपोषण करण्याची माझी तयारी आहे, समाजाला राज्यकर्त्यांनी आता गृहीत धरणे सोडून द्यावे आरक्षण कसे व कुठून द्यायचे ही सर्वस्वी जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे त्यामुळे आम्ही सांगण्यापेक्षा सरकारनेच ठरवावे. यापुढे मराठा समाज जी दिशा ठरवेल त्या दिशेबरोबर युवराज छत्रपती संभाजीराजे चालणार,
काही लोक बोलतात की जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी राजे या पक्षाची बाजू घेतात त्या पक्षाची बाजू घेतात हे पक्ष छत्रपती संभाजी राजेंना जवळचे आहे,संभाजीराजे मॅनेज झाले की काय असे अनेक अफवा उठवत असतात परंतु त्या लोकांना मी सांगू इच्छितो छत्रपती संभाजीराजे यांना मॅनेज करणारा अजून जन्माला यायचा आहे मी शिवशाहूंचा वारसदार आहे मॅनेज होणे माझ्या रक्तात नाही आणि तसे काही मला करायचे असते तर मी या आरक्षणाच्या लढ्यात पुढे आलोच नसतो,
अलिशान राजवाडा,फार्म हाऊस आहे या ठिकाणी निवांत बसून मी माझे जीवन जगू शकतो परंतु माझ्यावर संस्कार आणि विचार शिवशाहु यांचे आहेत त्यामुळे जे जे समाज घटक वंचित आहे त्या त्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य आहे आणि माझा ज्या घराण्यात जन्म झालेला आहे त्या घराण्याची मला ही शिकवण आहे. त्यामुळे अशा अफवा उठवणार्यांना माझे आवाहन आहे
मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र या व मोठी ताकद तयार करा,
आज महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील मराठा समाजासाठी अहोरात्र काम करणारे वेगवेगळे घटक या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांची उपस्थिती व एकी कायम राहिली तर निश्चितपणे समाजाचे सर्व प्रश्न लवकरच सुटतील,
गटतट निर्माण करून समाजाचे मोठे नुकसान आज पर्यंत झाले आहे त्यामुळे आपण सर्वांनी गटात न विभागता एका दिशेने व एक विचाराने समाजाचे प्रश्न सोडवू या, आम्ही आंदोलन पुकारले की राज्य सरकार काहीतरी थातुरमातुर आश्वासन देऊ करते म्हणून यापुढे आश्वासनावर न थांबता राज्य सरकारने कृतिशील जीआर काढावेत नाही तर संघर्ष अटळ आहे.
या राज्यव्यापी बैठकीत राज्यभरातून मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.
पुणे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या बैठकीचे अत्यंत चांगले नियोजन करण्यात आले.
डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून आत्तापर्यंत सरकारने काय केले, समाजाच्या पदरात काय पडले, पुढे काय करायचे याची सविस्तर मांडणी करण्यात आली या सर्वांसाठी सर्व पुणेकर समाज बांधवांचे,आयोजकांचे मनापासून आभार ही सर्व उपस्थित समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले. यावेळी टोकियो ऑलम्पिक मध्ये रोड मराठा समाजाच्या दोन तरुणांनी मेडल मिळविले त्यांनाही लवकरच महाराष्ट्रात आमंत्रित करून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने त्यांचे जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे यासाठी ही छत्रपती संभाजीराजे पुढाकार घेणार आहे,
त्याचबरोबर इतर ऑलिम्पिक खेळाडू नाही बोलण्याचा प्रयत्न केला जाईल. मराठा समाज हा कृतिशील विचाराने आणि गतिशील मार्गाने येणाऱ्या काळात नियोजनबद्ध आंदोलन करून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असेल.











































