Home विदर्भ संजय गांधी निराधार समिती सदस्य भातकुली तथा माजी सरपंच यांच्या वाढदिवसनिमित्त शालेय...

संजय गांधी निराधार समिती सदस्य भातकुली तथा माजी सरपंच यांच्या वाढदिवसनिमित्त शालेय विदयार्थ्यांना पुस्तक व पेन वाटप 

372

 धनराज खर्चान – भातकुली

अमरावती -: तालुक्यातील श्री क्षेत्र वायगाव येथे आज दि.७ आगस्ट रोजी माजी सरपंच तसेच संजय गांधी निराधार समिती सदस्य माननीय रोशनभाऊ झासकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने शालेय विद्यार्थाना पुस्तक व पेन यांचे वाटप करून आदर्श असा उपक्रम जनतेसमोर ठेवला.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून वायगाव येथील सरपंच शांताताई गाडे तसेच तालुका युवक काँग्रेस सचिव अमोल डोंगरे ,माजी सरपंच मनोहर भांडे , माजी उपसरपंच प्रकाशराव दामोधरे नंदुभाऊ अडबोल, संतोष भांडे, ग्रा.प.सद्स्य दिलीपभाऊ,माजी सदस्य अरुण भाऊ वानखडे इतर मान्यवर उपस्थित होते.