Home विदर्भ अमरावती – दर्यापूर मार्गावरील खारतळेगांव येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा जागीच...

अमरावती – दर्यापूर मार्गावरील खारतळेगांव येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

268

प्रतिनिधी- धनराज खर्चान

भातकुली- वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खारतळेगांव येथे आज दि.६ आगस्ट रात्री ८ .३० वाजताच्या सुमारास MH 40 BT 1490 हि दुचाकी घेऊन विश्वजित राजकुमार राऊत (३०) राहणार अमरावती हा दर्यापूर कडून अमरावती कडे जात असताना ग्राम खारतळेगांव येथे ढाब्या जवल रोडच्या बाजूला असलेल्या डिवायड्रर तो धडकला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती गावातील नागरिकांनी वलगाव पोलीस स्टेशन दिली. माहिती मिळताच वलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाली व मृत्यू देह शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठविण्यात आला. अधिक तपास वलगाव पोलीस स्टेशनचे पी.आय.ठाकूर , ए. पी.आय. गणेश बाभुळकर , पोलीस कान्स्टेबल निलेश गोडबोले करीत आहे .