
‘घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथील शेतकरी शरद उत्तमराव तौर यांचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर ( एम एच 21 बीक्यु 5728 ) दि. 20 जुलै रोजी त्यांच्या शेतातून रात्रीस चोरीला गेले होते.शोधाशोध करूनही तपास लागत नव्हता.कुंभार पिंपळगाव येथील पोलिस दुरक्षेत्र विभागात पिआय सोमनाथ नरके यांनी नुकताच पदभार स्वीकारला आणि ट्रॅक्टर चोरीचे प्रकरण हाती घेतले. पोलिस प्रशासन व गावातील शेतकरी यांच्या समन्वयाने ट्रॅक्टर शोधण्यास यश आले. ट्रॅक्टर चोरीला गेल्यानंतर काही कालावधीतच घनसावंगी पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस प्रशासनाने तपासाचे सूत्रे फिरवली.पोलिस प्रशासनास ट्रॅक्टर बीड जिल्ह्यात चोरीला गेले , असा संशय होता. व त्या दिशेने त्यांनी तपास चालू केला आणि एफ आय आर ची कॉपी सर्व वृत्तपत्रे व वृत्तवाहिनी कडे पाठवण्यात आली. त्यांनीही ट्रॅक्टर शोधण्यास सहकार्य केले. पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली , पोलिस अधीक्षक यांचे स्वीय सहायक भोसले, घनसावंगीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड , पोलिस निरीक्षक पतंगे , कुंभार पिंपळगाव पोलिस दुरक्षेत्र विभागाचे एपीआय सोमनाथ नरके,हरिशचंद्रे , केंद्रे यांनी तपास केला.
हिवरगव्हाण ता. वडवणी जि. बीड येथील शेतकरी मोहन राजेभाऊ नाईकवाडे यांनी फोन करून सांगितले की ट्रॅक्टर , हिवरगव्हाण येथे आहे. शेतकरी व पोलिस प्रशासन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता , चोरीला गेलेले ट्रॅक्टर दिसून आले. पुढील तपास पोलिस प्रशासन करत आहे.
याबद्दल शिवणगाव येथील गावकरी व शेतकरी यांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले.











































