
जातपडताळणी कायदा अजून कडक करण्यासाठी पुढाकार घ्यावा , शिष्टमंडळची मागणी
मनिष गुडधे – अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्याच्या सन्माननीय खासदार नवनीत रवीभाऊ राणा यांनी देशाचे महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना उद्देशून लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील जात चोरी करून नामसदृशाचा फायदा घेणाऱ्या जात चोरांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून व्हॅलिडीटी मिळत नाही. ही बाब समोर करून जात चोरी करणाऱ्या जात चोरांना कायमचे दरवाजे उघडे करण्यासाठी व त्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सन 2000 मध्ये दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र अनुसूचित जमाती पडताळणी समित्या स्थापन झाल्या आहे
त्या तातडीने रद्द करण्यात याव्यात व त्यांची संवैधानिकता तपासण्यात यावी अशा बाबतचे निवेदन जात चोरी करणाऱ्यांच्या समर्थनार्थ दिल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील आदिवासी समाजामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्याच्या खासदार सन्माननीय नवनीतजी रविभाऊ राना तसेच राष्ट्रपती कार्यालयातील एकूण यंत्रणेवर तीव्र निषेध व असंतोष व्यक्त करीत आहे, आज दिनांक 27/7/ 2021 रोजी अमरावती जिल्ह्याच्या नवनिर्वाचित जिल्हाधिकारी पवणीत कौर यांना , तसेच आ. राजकुमार पटेल यांनाआदिवासी शिष्ट मंडळ यांनी आमदार राजकुमार पटेल यांना निवेदन देण्यात आले जातपडताळणी कायदा कडक करण्यात यावा तसेच आदिवासी विरोधी भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधी विरुद्ध सर्व अनुसूचित जमाती च्या आमदार यांनी विधानसभेत आवाज उठवून खऱ्या आदिवासी यांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे मत शिष्टमंडळाने व्यक्त करीत निवेदन दिले ,त्यावेळी आदिवासी युवा क्रांति दल चे संस्थापक रामेश्वर युवनाते, माजी नगरसेवक राजुभाऊ मसराम , बंडुभाऊं मर्सकोले ,प्रशांत मडावी , देवानंद धुर्वे ,
तिरु.अर्जुनभाऊ यूनाते जिल्हाध्यक्ष ट्रायबल फोरम, तिरु. शशिकांतभाऊ आत्राम जिल्हाध्यक्ष,बिरसा क्रांती दल जिल्हा अमरावती, वैभव लोखंडे, आशिष राऊत, मंजिश खोडे पवन चांदेकर, नितीन नामुरते, राजेश उईके तसेच महिला व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.










































