Home नांदेड पोलीस कर्मचारी असलेल्या नराधम बापाने आपल्या लहान मुलीवर केला अत्याचार ,

पोलीस कर्मचारी असलेल्या नराधम बापाने आपल्या लहान मुलीवर केला अत्याचार ,

804

 

खाकीला कलंकीत करणाऱ्या त्या नराधमांस पोलिसांनी केली अटक ,

अमीन शाह

नांदेड : तीन लग्न झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या आपल्या दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नांदेडमध्ये उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी पोलीस कर्मचारी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. पहिली बायको सोडल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले होते. परंतु तिच्याशीही न पटल्याने त्याने अन्य एका महिलेशी सूत जुळविले होते. परंतु, दुसऱ्या पत्नीपासून झालेल्या दोन मुले आणि मुलींशी भेटण्यासाठी तो नेहमी येत होता. त्यातूनच काही दिवसांपूर्वी त्याने दारूच्या नशेत दहा वर्षीय मुलीवर अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर या प्रकरणात पीडित चिमुकलीच्या आईने शिवाजी नगर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.