
मजहर शेख, नांदेड
नांदेड/बिलोली, दि : १९ :- गेल्या सात वर्षा पासुन थकीत पडलेल्या जिल्ह्यातील चार लाख गुंतवणुकदाराचे पर्ल्स कंपनीतील साडे तिनशे कोटी च्या जवळ झालेली गुंतवणूक सेबी कडून परत मिळविण्यासाठी व गुंवणुकदारा कडून एजंटाला होणारा त्रास थांबावुन त्यांना संरक्षण देण्यासाठी जिल्ह्याचे खासदार प्रताप पा.चिखलीकर,पालकमंत्री अशोकराव चव्हाण,जिल्हाधिकारी विपिन इटणकर,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांना एंजटा कडुन निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की,पिएसिएल ( पर्ल्स ) ही कंपनी २०१४ पासुन बंद स्थितीत असून केवळ नांदेड जिल्हातील चार लाख गुंतवाणुकदाराचे तब्बल साडेतिनशे कोटी रुपये अडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे,तर यातील सेबीने आँनलाईन फार्म मागवुन काही गुंतवणुकदाराची पाच ते दहा हजारा पर्यतची रक्कम अदा केली आहे.तर मोठी रक्कम असलेल्या गुंतवणूकदार हा एंजटाच्या मागे पैसे द्या म्हणून तगादा लावत असून एजंटाला मात्र शिवीगाळ सह मारहाण ही होत आहे,परिणामी एजंट हा गाव सोडून इतरत्र पलायण करत आहे तर काहीजण आत्महत्या सारख्या मार्गचा अवलंब करत आहेत तेव्हा सर्व एजंटाला संरक्षण देण्यात यावे व सेबि कडे सोपवण्यात जबाबदारी तात्काळ राबवुन सर्व गुंतवणुकदाराची रक्कम परतफेड करावी अशा आशयाचे निवेदन खा.प्रताप पा.चिखलीकर,पालकमंत्री अशोकराव चव्हाण,जिल्हाधिकारी विपिन इटणकर,पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या कडे कंपनीचे एजंट शंकर गंगुलवार,युनुस शेख,दादाराव इंगळे,मन्मथ स्वामी,संभाजी शेळके,शिवराज पाटील,सि.एच.चिंतले,मैनौदिन सय्यद,हणमंत तरटे,रामचंद्र पाटील,सुर्यकांत पा.शिंदे,दिलीप इभुते,श्रीरामे सुरेश,सायलु अंगावर,यांच्या सह असंख्य एंजटानीही मागणी केली आहे.











































