Home मुंबई भररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद

भररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद

850

8 जुलै रोजी बोरिवली पश्चिम भागात ही घटना घडली होती.तलवार हल्ल्यात सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले आहेत. एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींना अटक केली आहे.

मुंबई : बोरिवली भागात मारहाण करुन सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. ही घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वकिलावरील हल्ल्याची एकाच दिवसात दुसरी घटना समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?
तलवार हल्ल्यात सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले आहेत. 8 जुलै रोजी बोरिवली पश्चिम भागात ही घटना घडली होती. एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींना अटक केली आहे. कलम 307, 326,324, 504 आणि 506 अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. वकिलावर झालेल्या तलवार हल्ल्याची दृश्य मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झाली आहेत.