
धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी
अमरावती – शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार,शिवसेना नेते,खासदार अरविंद सावंत,शिवसेना नेते आनंदराव अडसुळ, पश्चिम विदर्भ समन्वयक,मा.आमदार अरविंद नेरकर,अमरावती जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्यामभाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव गणातील वाढोणा येथे शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार धाने पाटील,तालुकाप्रमुख आशिष धर्माळे,विधानसभा संघटक मनोज कडू,सरपंच प्रशांत हुडे हे होते.कार्यक्रमाचे आयोजन तालुकाप्रमुख निलेश तिवारी यांनी केले होते. याप्रसंगी जिल्हाप्रमुख श्यामभाऊ देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनते करिता सरकार म्हणून घेतलेले लोकांभिमुख निर्णय,जनहिताच्या योजना आणि शिवसेनेचे ८०% समाजकारण आणि २०% राजकारण याविषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला सुरेश जुनघरे,प्रकाश गुडधे,विवेक गुडधे,बाबु पाटील,संजय श्रृगारे,गोपाल ठाकरे,भुषन गुडधे,बंडू जुनघरे,गजानन फिरके,सचिन जुनघरे,भवराव बुटके,रतनलाल जयस्वाल,विणय हूडे,परशांत जुनघरे,सचिन भंडारी,मिलींद हुडे,गणेश शुगांरे,सुभाष नेरकर,विलास गुडधे,सुनिल काळे,धनराज धोपटे सह पदाधिकारी व बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.










































