Home परभणी एम.आय.एम पक्षाच्या पाथरी विधानसभा अध्यक्षपदी हाफिज अली शेर कुरैशी यांची निवड

एम.आय.एम पक्षाच्या पाथरी विधानसभा अध्यक्षपदी हाफिज अली शेर कुरैशी यांची निवड

700

परभणी/प्रतीनीधी

एम.आय.एम पक्षाच्या पाथरी विधानसभा अध्यक्षपदी हाफिज अली शेर भाई खुरेशी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले की आपली एम. आय.एम पक्षाबद्दल निष्ठा व कार्याची दखल घेऊन व आपन यापूर्वी जिल्हा कनविनियर (district conveniour) या पदावर होते.तसेच परभणी जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूका जवळ असल्याने आपली ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या पाथरी विधानसभा अध्यक्षपदी पुढील आदेशापर्यंत निवड करण्यात येत आहे.असे नियुक्ती पत्रात परभणी जिल्हा अध्यक्ष अॅड इम्तीयाज खान साहब यांनी नमूद केले आहे.पुढे नियुक्ती पत्रात नमूद केले की ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अल- हाज बॅरिस्टर असदोद्दिन ओवोसी साहेब व एम.आय.एम पक्षाची विचारसरणी,ध्येय व धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावे पाथरी विधानसभा अंतर्गत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या उन्नती व प्रगतीसाठी कार्य करावे व तसेच परभणी जिल्ह्यात अल- हाज बॅरिस्टर असदोद्दिन ओवोसी साहेब यांचे हाथ बळकट करण्याचे कसोशीने प्रयत्न करताल असे नियुक्ती पत्रात नमूद करून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या वतीने नियुक्तीबद्दल हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.हाफिज अली शेर कुरैशी यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.