
39 वर्षे सेवा केली आता राजकीय निर्णय घ्या; उपस्थित अतिथी व ग्रामस्थांचे आवाहन

अंबड तालुक्यातील चिचंखेड येथील पदमाकर सोळंके यांनी 39 वर्षे एका चाकोरीत बाजार समितीचे क्लार्क पासून सचिव पदापर्यंतचा प्रवास केला या काळात त्यांनी समाजातील सर्व क्षेत्रात जनाधार निर्माण केलेला असुन सेवानिवृत्ती नंतर आता त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण करुन जिल्हा परिषदेची निवडणूक लढवल्यास आमचा पाठिंबा राहिल असे आवाहन केंद्रीय मंत्री रावसाहेब पा.दानवे यांचे स्वीय सहाय्यक चंद्रशेखर मोहरीर यांनी केले.
चिचंखेड येथील खंडोबा मंदिराच्या सभागृहात श्री. सोळुंके यांच्या सत्कार सोहळ्याचे दि.4 रोजी सकाळी 11 वा आयोजन करण्यात आले होते यावेळी बाबा सोळुंके यांचा फोटो असलेले पाच रुपयांच्या टपाल तिकीटाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाला नगरसेवक केदार कुलकर्णी, चंद्रशेखर मोहरीर, रमेश पैठणे,सुरेश भावले,कपील शेजूळ,सुहास सोडाणी ,दै.गावकरी चे संपादक दिनेश हारे, बाळु लाहोटी,कैलास अग्रवाल,कचरु साळवे यांचेसह विविध क्षेत्रातील महिला पुरुष उपस्थित होते.
केदार कुलकर्णी बाबा सोळुंके यांच्या बद्दल बोलतांना म्हणाले कि मी बाजार समितीचा संचालक झाल्यानंतर माझे वडील बाबुराव कुलकर्णी यांनी मला बाबा सोळुंके यांचे मार्गदर्शन घेवून पुढील वाटचाल करा त्यांच्या कडे समयसूचकता आणि अनुभव आहे असे सांगितले होते त्यामुळे सतत त्यांच्या माध्यमातून विविध विषयावर चर्चा करीत असे त्यांच्या सत्काराला सभागृह क्षमतेपेक्षा जास्त लोक उपस्थित आहे हीच त्यांच्या कामाची पावती असुन त्यांनी आता राजकीय निर्णय घ्यायला हरकत नाही तर कचरु साळवे म्हणाले कि सर्वधर्मसमभाव जोपासून त्यांनी सकारात्मक काम केल्याने कायम आपण बाबा सोळूंके यांच्या पाठिशी असल्याचे प्रतिपादन केले.
तर सत्काराला उत्तर देतांना बाबा सोळुंके म्हणाले कि लोकांचे कामे करण्याकरिता पर्याय शोधत असे नेहमीच सकारात्मक राहुन बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ, तालुक्यातील सर्व पक्षांचे पुढारी पदाधिकारी, पत्रकार यांच्याशी समन्वय ठेवून असायचो 2010-2021 या अकरा वर्षाच्या कारकिर्दीत अनेक चांगले निर्णय घेवून बाजार समितीचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले दरम्यान दुष्काळाच्या काळात चारा छावण्यांतून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती आता सेवानिवृत्ती घेतली असुन गावाच्या विकासासाठी लवकरच राजकीय निर्णय घेईन जी जनतेची इच्छा आहे ती मी पुर्ण करीन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन आभार रामभाऊ लांडे यांनी मानले तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश गोरे,भगवान गोल्टे सह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.











































