Home विदर्भ कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवारांचे प्रलंबित प्रश्ना करीता आमदारांना निवेदन

कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवारांचे प्रलंबित प्रश्ना करीता आमदारांना निवेदन

516

सय्यद मतीन

यवतमाळ – अनेक दिवसांपासून कंत्राटी कामगाररांचे प्रश प्रलंबित आहेत अनेक वेळा मंत्रालय व विधानसभेवर आंदोलने केली. परंतु या प्रश्नावर उदानसीता दाखविल्या गेली. तरी या विषयावर आपण लक्ष घालून कंत्राटी कामगारांना न्याय देण्यात यावा असे निवेदन आमदार अशोक उईके यांना कंत्राटी कामगार यांनी दिले आहे.

महावितरण, महापरिषण, माहापारेष महानिर्मिती कंपनीमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना कोविड 19च्या कालावधी मधील सेवाकाळ पाहता त्यांना कायम सेवेत सामावून घेणे. त्याकरिता विशेष भरती मोहीम राबवावी, महावितरण, महापरिषण, महानिर्मिती कंपनी मध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या प्रशिक्षनार्थी करिता मा.ऊर्जामंत्री यांनी घोषित केलेल्या 25 टक्के वाढीव आरक्षणाची अंबालबजावणी करण्यात यावी,माहापारेष कंपनीमध्ये तृतीय,व चतुर्थ,श्रेणीत सरळ सेवा भरतीमध्ये आटीआय तारयंत्री (वायरमन) उमेदरांना संधी देण्यात यावी.
कंत्राटी कामगारांना सरळ सेवा भरती मध्ये आरक्षण देवून प्राधान्याने सामावून घ्या,शासनाने सरळ सेवा भरती वयोमर्यादेमध्ये वाढ केली आहे परंतु महावितरण कंपनीमध्ये अद्याप या बाबत काहीच कार्यवाही केली नाही.विधुत साह्ययक, उपकेंद्र साह्ययक भरती प्रक्रिया नतंर कंत्राटी कामगारांना कामावर कमी करण्यात येऊ नये असे निवेदन आमदार उईके यांना दिले आहे.