Home विदर्भ राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर सासरवाडी नाजिक झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी !

राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर सासरवाडी नाजिक झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी !

449

गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात झाला अपघात

रवींद्र साखरे

वर्धा / तळेगाव शा पंत :-राष्ट्रीय महामार्ग ६ वर सारवाडी  नजीक डीझेल घेऊन जाणाऱ्या टॅंकरला गाय आडवी आल्याने टँकर पलटी होऊन चालक किरकोळ जखमी झाला याबाबत असे की टँकर क्रमांक जी.जे.०३बी.व्ही.५४९६ नंबर असलेला टँकर अमरावती कडून नागपूर च्या दिशेने जात असताना अचानक टँकर समोर गाय आली असता गाईला वाचवन्याचा प्रयत्न टँकर चालकांनी केला असता टँकर अनियंत्रित होवून महामार्गाच्या बाजूला जाऊन पलटी झाला यात चालक गजानन बनसाडे रा , बीड हा किरकोळ जखमी झाला मदतकार्य म्हणून घटनास्थळी आर्वी अग्निशमनदल, तळेगाव (शा.पंत) पोलीस दाखल झाले पुढील कारवाई ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली ए.यस.आय. गजानन बावणे , रोशन कैलुके ,राहूल अमोने, गृहरक्षण दलाचे शारुख खान करीत आहे