Home नांदेड गौरी येथे विद्युत शॉक लागून दोन बैल जागीच ठार , “शेतकऱ्यांचे दोन...

गौरी येथे विद्युत शॉक लागून दोन बैल जागीच ठार , “शेतकऱ्यांचे दोन लाखांचे नुकसान”

687

नांदेड/किनवट, दि : ३०:- महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे बैल दगावले येथून जवळच असलेल्या मोजे चापलानाईक तांडा (गौरी) ता.किनवट येथील शेतकरी पांडुरंग हिरामण राठोड हे नेहमीप्रमाणे आपले दोन बैलजोडी घेऊन शेतात डवरे मारण्यासाठी जात असताना शेता शेजारी नाल्यात बैलांना पाणी पिण्यासाठी नेले असता नाल्या शेजारी विद्युत पोल होता त्या खांबातील विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने बैल पाणी पिण्यासाठी पाण्यात गेले असता दोन्ही बैलांना करंट लागल्याने दोन्ही बैल जोडी त्याच ठिकाणी मरण पावले त्या बैलाचे कासरे शेतकऱ्यांच्या हातात होते त्यांचे नशीब बलवंतर होते म्हणून तो शेतकरी वाचला ही घटना दिनांक 29 जून रोजी सकाळी 8:00 च्या दरम्यान घडली या घटने बदल गावात हळहळ व्यक्त होत असून दुष्काळाच्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांचे अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाले असून शासनाने याची गंभीरतेने नोंद घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे .