Home मराठवाडा घनसावंगी तालुक्यातील मासेगाव,घोंसी,देवीदहेगाव सह परिसरात जोरदार पाऊस, खरिपातील पेरणी वेगात

घनसावंगी तालुक्यातील मासेगाव,घोंसी,देवीदहेगाव सह परिसरात जोरदार पाऊस, खरिपातील पेरणी वेगात

605

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरातील काही भागात गेल्या चार दिवसांत पाऊस पडल्यानंतर रविवारी, सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील मासेगाव ,घोनसी,देवी दहेगाव, काकडे कंडारी,जिरडगाव,हातडी,बेलवाडी,भानुसे बोरगाव शेतशिवारात जोरदार पाऊस झाला खरिप पेरणी आणि लागवडीसाठी शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू आहे.घनसावंगी तालुक्यात यावर्षी सोयाबीन मोठ्या प्रमाणावर पेरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे तर कपाशी लागवड टक्केवारी घटली आहे.बेलवाडी,जिरडगाव शिवारात यावर्षी हळद आणि मिरची लागवडीसाठी शेतकरी उत्सुक आहेत तर मासेगाव शिवारात गेल्यावर्षी पपईच्या फळबागांवर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाले त्यामुळे तरी देखील काही शेतकऱ्यांनी स्वत:च्या हिंमतीवर पपई लागवड केल्याने सध्यातरी पपईच्या बागा बऱ्यापैकी आहेत,परंतु पपईचे उत्पादन शेवटपर्यंत हाती लागेल याची गॅरंटी नाही असे मासेगावचे सरपंच चत्रभुज आनंदें यांनी सांगितले.काही शेतकरी नवनवीन प्रयोग करून पाहतात ,आद्रक,कांदा, मोसंबी,मिरची, कोथिंबीर,आंबा,जांब, सिताफळ लागवड करताना आढळून येते.तालुक्यात कमी अधिक प्रमाणात सर्वदूर पाऊस पडत असल्याने शेतकरी व्याज, बट्याने पैसा उभा करून महागामोलाचे बियाण्याची पेरणी करत आहेत.गोदावरी परिसरात तसेच डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड झालेली आहे.शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचा पोत खराब होत असल्याने तसेच भविष्यात नापिकीच्या भितीने जैविक खते कीडनाशके यावर विश्वास दाखवला जातो आहे.खालापुरी येथील जनार्दन मरकड या धाडसी शेतकऱ्याने जैविक खते औषधी वापरून १३ एकर ऊस जतन करून बेणे स्वरूपात चांगल्या भावाने विकत आहेत.एकरी ११० टन,तर दुरीच्या ऊसाला एकरी ८० टनाचा उतारा आल्याचे त्यांनी सांगितले जालनाचे जैविक शेती सल्लागार कृष्णा आर्दड यांनी सांगितले की, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे माणवाचे आरोग्य धोक्यात आले आहे शेती आणि शरीर विषमुक्त करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.