Home विदर्भ मालवाहु पलटी होऊन दोन जण गंभीर जखमी

मालवाहु पलटी होऊन दोन जण गंभीर जखमी

211

इकबाल शेख 

वर्धा / तळेगाव (शामजी पंत ) :- येथील राष्ट्रिय महामार्ग क्रं. ६ वरील टि पाईंटवर अमरावती वरून नागपूरकडे अगरबत्ती घेवुन भरघाव जात असलेला MH – 12 JF- 7642 क्रमांकाचा मालवाहु पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला यामध्ये चालक व वाहक हे दोघेहि गंभीर जखमी झाले.हि घटना दुपारी ४ वाजताचे दरम्यान घडली असुन सदर घटनेची माहिती तळेगाव पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना पोलीस वाहनानेच उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे नेण्यात आले. वृत्त लिहेस्तोवर जखमीचे नाव कळु शकले नाहि. घटनेची नाेंद तळेगाव पोलीसांनी घेतली असुन अधिकचा तपास जमादार वसंत मुंगले, अमोल इंगोले, रवि उईके करीत आहे.